Friday, April 12, 2024
Home सामाजिक जश्न-ए-गुलजार ! 'प्रभात' मध्ये कलम के जादूगर को संगीतमय सलामी

जश्न-ए-गुलजार ! ‘प्रभात’ मध्ये कलम के जादूगर को संगीतमय सलामी

अकोला दिव्य न्युज ब्युरो : सुप्रसिद्ध गीतकार, पटकथाकार, शायर ’गुलजार‘ यांना नुकताच साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ जाहीर झाल्याच्या सन्मानार्थ विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोला, डॉ. गिरीश गांधी फाऊंडेशन, नागपूर आणि प्रभात किड्स स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जश्न-ए-गुलजार’ अर्थात ‘कलम के जादूगर को संगीतमय सलामी‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गुलजारांच्या गीतांची जादूच अशी की, मुरलेल्या गुलकंदासारखी ! अशा बहारदार कार्यक्रमाचा सोहळा वाशिम रोड स्थित प्रभात किड्स स्कूलच्या सभागृहात भरगच्च रसिकांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाची संकल्पना विदर्भ साहित्य संघ, नागपूरच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य डॉ. गजानन नारे यांची होती.
आनंद पद्मन यांनी ‘परिचय’ चित्रपटातील ‘मुसाफिर हूँ यारो’ गुलजार यांच्या शब्दांनी गुलजार झालेले गीत सादर करून कार्यक्रमाची सुरूवात केली. आशिष खुरपे यांनी ‘तुझसे नाराज नही जिंदगी’ हे गीत सादर केले. ‘वो शाम कुछ अजीब’ हे अमरीश तनेजा यांनी तर ‘लेकीन’ चित्रपटातील ‘यारा सीली सीली’ हे गीत रश्मी देव यांनी नजाकतीने सादर केले. ’आनंद’ या गाजलेल्या चित्रपटातील ‘मैने तेरे लिये…’ हे गीत अतुल डोंगरे यांनी तर ‘बरसो रे मेघा मेघा’ हे ‘गुरू’ चित्रपटातील गीत भूमिका राऊत व त्यावर नृत्य श्रृती गोरे व स्वप्नाली बंड यांनी सादर केले.

‘तेरे बीना जिंदगी से कोई’ हे गीत अ‍ॅड. वल्लभ नारे यांनी सादर करून रसिकांची मने जिंकली. सर्व गायकांनी एकापेक्षा एक सरस गीते सादर करीत रसिकांना सुरेल मेजवानी दिली. ‘मौसम’ चित्रपटातील ‘दिल धुंडता है’ आणि ‘बंटी और बबली’ या चित्रपटातील ‘कजरारे-कजरारे‘ या युगल गाण्यांवर प्रज्योत देशमुख, भूमिका राऊत व विजय वाहोकार यांनी रॉकिंग परफॉर्मन्स दिला. ’लकडी की काठी’ हे ‘मासूम’ चित्रपटातील गीत बालकलाकार व गायिका परिणीता बारापात्रे हिने तर ‘उंगली पकडके तुने’ हे भूमिका राऊत यांचे गीत उपस्थित रसिकांना भावविभोर करून गेले. ‘स्लम डॉग मिलेनियर’ या चित्रपटातील ऑस्कर पुरस्कार प्राप्त ‘जय हो..’ हे गीत प्रज्योत देशमुख यांनी सुरेल अशा आपल्या आवाजात गायलेल्या मॅशअप् गीतांनी संपूर्ण सभागृह चैतन्याने न्हाऊन गेला.
संपूर्ण कार्यक्रमाचे शायरीपूर्ण व प्रसंगोचित निवेदन मो. आसिफ जारियावाला व झिनल सेठ यांनी केले. या बहारदार कार्यक्रमामध्ये अ‍ॅड. वल्लभ नारे, प्रज्योत देशमुख, अ‍ॅड. शिवम भौरदकर, आनंद बोराटने, धम्मपाल शेगोकार, नंदकिशोर डंबाळे, अतुल डोंगरे या कलाकारांनी गुलजारांच्या गीताला समर्पक साथ दिली.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉ. गजानन नारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लाईट व साऊंड सहाय्य सचिन मुरुमकार, जय आसोलकर ग्राफीक्स विजय गजभिये, अनिरुद्ध डेकाटे, पंकज देशमुख, मुद्रीत शोधन प्रा. डॉ. सुहास उगले, छायाचित्रण निखिल वडतकर, दिनेश आगाशे व तांत्रिक सहाय्य श्रीकांत बुलबुले व प्रशांत तळोकार यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

संस्कृती संवर्धन यात्रेत ‘मतदानाचा हक्क बजावा’ चं आवाहन ! शहरात ठिकठिकाणी उत्साहात स्वागत

अकोला दिव्य न्युज ब्युरो : गुढीपाडवा अर्थात चैत्र शुक्ल प्रतिपदा, हिंदू नववर्षाची सुरूवात. यानिमित्त शहरातून ग्रामदैवत राजराजेश्वर, जय श्रीरामचा जयघोष करीत, संस्कृती संवर्धन...

नानी बाई को मायरो ! राजस्थानी दिनानिमित्त 9 एप्रिलला सांस्कृतिक सोहळा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शहरातील राजस्थानी समाजातील सर्व जाती समूहाच्या सांस्कृतिक संवर्धन व सामाजिक एकोपासाठी गत 29 वर्षापासून दरवर्षी गुढीपाडव्याला राजस्थानी...

शेगावच्या ‘श्रीं’ वर अशीही श्रध्दा ! चक्क व्याहीची (समधी) अंत्ययात्रा निघाली व्याहीचा घरातून

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : कर्त्या पुरुषाला संसार करताना बरीच संकटे येतात, अशात मुळीच न डगमगता, जीव आणि ब्रह्म एकच...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

राणांच्या अमरावतीत आतापासूनच मतदानाला सुरुवात; बॅलेट पेपर, ही नवी सुविधा काय? 

अकोला दिव्य न्युज ब्यूरो : कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने आयोगाने यावर्षी प्रथमच ८५ वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांसाठी...

प्रख्यात जेष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर साताऱ्यात झाली अँजिओप्लास्टी ! प्रकृती स्थिर

अकोला दिव्य न्युज ब्युरो : मराठीसह हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदेंच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. गुरुवार...

अबकी बार ‘दे-मार’ ! 100 दिवसात भाजपचा ऑनलाईन 76.87 कोटींचा खर्च : 2019 च्या तुलनेत खर्च तिप्पट

गजानन सोमाणी •एडिटर इन चीफ : सलग तिसऱ्यांदा देशातील केंद्रीय सत्तेत येण्याचा आत्मविश्वास बाळगणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेत, निवडणूक प्रचारात...

आता नागपूर-पुणे-नागपूर सुपरफास्ट समर स्पेशल आठवड्यातून तीन दिवस : आरक्षण सुरू

अकोला दिव्य न्युज ब्युरो : नागपूर-पुणे-नागपूर ही सुपरफास्ट समर स्पेशल ट्रेन आता आठवड्यातून दोन नव्हे तर तीन दिवस चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वे...

Recent Comments