Friday, April 12, 2024
Home न्याय-निवाडा ओरडू नका, हे न्यायालय आहे ! तिन्ही वकिलांची खरडपट्टी काढली : सरन्यायाधीश...

ओरडू नका, हे न्यायालय आहे ! तिन्ही वकिलांची खरडपट्टी काढली : सरन्यायाधीश चंद्रचूड का भडकले

अकोला दिव्य न्युज ब्युरो : सर्वोच्च न्यायालयामध्ये ‘इलेक्टोरल बाँड’ बाबतच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा पारा चढला. आज सोमवारी सुरुवातीला ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी सरन्यायाधिशांच्या कोपाचे शिकार झाले. त्यानंतर ॲड. मॅथ्यूज नेदुम्परा यांनी चढ्या आवाजात संभाषण केल्याने सरन्यायाधीश संतापले. सरन्यायाधिशांनी मॅथ्यूज यांना कठोर शब्दात सांगितले की, माझ्यावर ओरडू नका. हे न्यायालय आहे कुठली सभा नाही. त्यानंतर सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष आदिश अग्रवाल यांनाही सरन्यायाधिशांच्या कोपाचा प्रसाद मिळाला. या तिन्ही वकिलांची खरडपट्टी काढत कोर्टाने या प्रकरणावर आदेश दिला.

आज सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर मुकुल रोहतगी यांनी उभे राहून सांगितले की, ते  FICCI आणि ASSOCHAM कडून हजर होत आहेत आणि त्याबाबतचं निवेदन दाखल केलं आहे. त्यावर सरन्यायाधीशांनी सांगितले की, मला असं कुठलंही निवेदन मिळालेलं नाही. त्यानंतर रोहतगी काहीतरी बोलले. त्यावर सरन्यायाधीश म्हणाले की, तुम्ही निर्णय झाल्यानंतर आला आहात. आता आम्ही तुमचं म्हणणं आताच ऐकू शकत नाही.मुकुल रोहतगी यांच्यानंतर त्यांच्या बाजूलाच उभ्या असलेल्या ॲडव्होकेट मॅथ्यूज नेदुम्परा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांनी सांगितलं की, संपूर्ण निर्णय हा नागरिकांना अंधारात ठेवून सुनावण्यात आला. त्यावेळी सरन्यायाधीशांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तेवढ्यात सरन्यायाधीशांनीही कठोर भाषा वापरण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की, माझ्यावर ओरडू नका. ही काही कुठली चौक सभा नाही. कोर्ट आहे. जर तुम्हाला निवेदन पुढे आणायचं असेल तर निवेदन दाखल करा. हेच आम्ही मुकुल रोहतगी यांना सांगितलं आहे. मात्र सरन्यायाधीशांचं म्हणणं ऐकल्यानंतरही नेदुम्परा गप्प बसले नाहीत. तेव्हा न्यायमूर्ती बी.आर. गवई यांनी तुम्हाला कोर्टाचा अपमान केल्याची नोटिस हवी आहे का? असे परखड शब्दात विचारले.

या दोन वकीलांनंतर व्हिडिओ कॉन्फ्रसिंगच्या माध्यमातून हजर झालेले एससीबीएचे अध्यक्ष आदिश अग्रवाल यांनी वादात उडी घेतली. त्यांनी सुमोटो रिह्यूसाठीच्या आपल्या याचिकेचा उल्लेख केला. त्यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी इशारा देताना सांगितले की, ‘मिस्टर अग्रवाल, तुम्ही एक वरिष्ठ वकिल आहात, सोबतच एससीबीएचे अध्यक्षही आहात. तुम्हाला प्रक्रिया माहिती असली पाहिजे. तुम्ही मला एक पत्र लिहिलंय, हे सर्व पब्लिसिटीसाठी आहे. आम्ही त्याला परवानगी देणार नाही. त्या मुळे हे कृपया तिथेच ठेवा. नाहीतर मला असं काही सांगावं लागेल जे अप्रीय असेल.  

RELATED ARTICLES

सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यांवर गुन्हा दाखल ! आक्षेपार्ह पोस्टसाठी 13 जणांचा शोध सुरू

अकोला दिव्य न्युज ब्युरो : लोकसभा निवडणुकीच्या काळात महापुरुषांची बदनामी, विटंबना करण्याचा प्रयत्न करणे, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट हुडकून काढणे माध्यम...

मोठी बातमी ! डॉन अरुण गवळीला शिक्षेत सूट देण्याच्या मागणीवर 4 आठवड्यात निर्णय घ्या ! हायकोर्टाचा आदेश

अकोला दिव्य न्युज ब्युरो : मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळी याला १० जानेवारी २००६ रोजीच्या शासन निर्णयानुसार शिक्षेत सूट देण्याच्या मागणीवर चार...

नवनीत राणा यांना ‘सुप्रीम’ दिलासा ! जात प्रमाणपत्र वैध, निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अमरावतीच्या विद्यमान खासदार आणि महायुतीतील भाजप उमेदवार नवनीत कौर राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवनीत राणांचं...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

राणांच्या अमरावतीत आतापासूनच मतदानाला सुरुवात; बॅलेट पेपर, ही नवी सुविधा काय? 

अकोला दिव्य न्युज ब्यूरो : कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने आयोगाने यावर्षी प्रथमच ८५ वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांसाठी...

प्रख्यात जेष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर साताऱ्यात झाली अँजिओप्लास्टी ! प्रकृती स्थिर

अकोला दिव्य न्युज ब्युरो : मराठीसह हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदेंच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. गुरुवार...

अबकी बार ‘दे-मार’ ! 100 दिवसात भाजपचा ऑनलाईन 76.87 कोटींचा खर्च : 2019 च्या तुलनेत खर्च तिप्पट

गजानन सोमाणी •एडिटर इन चीफ : सलग तिसऱ्यांदा देशातील केंद्रीय सत्तेत येण्याचा आत्मविश्वास बाळगणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेत, निवडणूक प्रचारात...

आता नागपूर-पुणे-नागपूर सुपरफास्ट समर स्पेशल आठवड्यातून तीन दिवस : आरक्षण सुरू

अकोला दिव्य न्युज ब्युरो : नागपूर-पुणे-नागपूर ही सुपरफास्ट समर स्पेशल ट्रेन आता आठवड्यातून दोन नव्हे तर तीन दिवस चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वे...

Recent Comments