Thursday, December 12, 2024
Homeसामाजिक12 th Fail ! महाराष्ट्र पोलिस महानिरीक्षक पदावर मनोज शर्मा यांना बढती...

12 th Fail ! महाराष्ट्र पोलिस महानिरीक्षक पदावर मनोज शर्मा यांना बढती ! लोकांना म्हटलं Thanku

अकोला दिव्य न्युज ब्युरो : नुकत्याच प्रदर्शित 12 th Fail या हिंदी चित्रपटाने चर्चेत आलेल्या आयपीएस मनोज शर्माचे आता प्रमोशन करण्यात आले आहे. मनोज कुमार शर्मा यांना महाराष्ट्र पोलिसात उपमहानिरीक्षकपदावरुन महानिरीक्षक (IG) पदावर बढती देण्यात आली आहे. त्यांच्या कारकिर्दीतील ही महत्त्वाची कामगिरी मानली जात आहे. कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने (ACC) 2003, 2004 आणि 2005 बॅचच्या IPS अधिकाऱ्यांना पदोन्नती मंजूर केली होती.

युवा पिढीसह सर्वांना प्रेरणादायी असलेला 12 वी फेल हा हिंदी चित्रपट आयपीएस मनोज शर्मा यांच्या जीवनावर आणि संघर्षावर आधारित आहे. अत्यंत गरीब कुटुंबातून आलेला मनोज शर्मा बारावीत नापास होऊनही यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन कसा आयपीएस अधिकारी बनला, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. त्यानी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर प्रमोशन मिळाल्याची माहिती देखील शेअर केली आणि याबद्दल आपल्या हितचिंतकांचे आभार मानले.

लोकांना प्रमोशनची माहिती देताना मनोज शर्मा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिलं, ‘एएसपी’ पासून सुरू झालेला प्रवास भारत सरकारच्या आदेशानुसार आयजी होण्यापर्यंत पोहोचला आहे, या प्रदीर्घ प्रवासाला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!