Thursday, December 12, 2024
Homeताज्या घडामोडीमोठी बातमी ! अकोला गुलदस्त्यात मात्र अमरावतीतून बळवंत वानखेडे ! कॉंग्रेसचे संभाव्य...

मोठी बातमी ! अकोला गुलदस्त्यात मात्र अमरावतीतून बळवंत वानखेडे ! कॉंग्रेसचे संभाव्य 9 उमेदवार

अकोला दिव्य न्युज ब्युरो : राज्यात महाविकास आघाडीतील एकाही पक्षाने अद्याप आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही. मात्र आज काँग्रेसच्या निवडणूक समितीची नवी दिल्ली येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून या बैठकीत महाराष्ट्रातील काही उमेदवार निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. राज्यात काँग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. त्यामुळे आघाडीच्या जागावाटपात ज्या जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे, त्या जागांवरील उमेदवारांबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

नवी दिल्ली येथे काँग्रेस मुख्यालयात झालेल्या बैठकीला काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन महासचिव के. सी. वेणूगोपाल, प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी केंद्रीय मंत्री अंबिका सोनी, सलमान खुर्शीद, मधुसूदन मिस्त्री पी.एल. पुनिया यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात उपस्थित होते. बैठकीत काही नावांबाबत एकमत झाल्याची माहिती आहे.

काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची यादी

नागपूर       – विकास ठाकरे 
नांदेड         – वसंत चव्हाण
लातूर         – शिवाजी काळगे
नंदुरबार     – के.सी.पाडवी 
गडचिरोली – नामदेव उसेंडी 
कोल्हापूर  – शाहू महाराज छत्रपती
सोलापूर    – प्रणिती शिंदे 
पुणे           – रविंद्र धंगेकर 
अमरावती  – बळवंत वानखेडे

दरम्यान, या उमेदवारांबाबत काँग्रेसकडून अद्याप अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नसली तरी कोणत्याही क्षणी आम्ही उमेदवारांची घोषणा करू,  असं के. सी. वेणूगोपाल यांनी सांगितलं आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!