Saturday, December 14, 2024
Homeताज्या घडामोडीअकोल्यात अँड.आंबेडकर की डॉ. पाटील ! आज मविआची बैठक : वंचितला...

अकोल्यात अँड.आंबेडकर की डॉ. पाटील ! आज मविआची बैठक : वंचितला 4 जागा ?

अकोला दिव्य न्युज ब्युरो : महाविकास आघाडीच्या माध्यमातून जागावाटपात महाराष्ट्रात ज्या जागा मिळण्याची शक्यता आहे, त्या जागांबाबत नवी दिल्ली येथे काल बुधवारी झालेल्या काँग्रेसच्या निवडणूक समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत काही उमेदवार निश्चित करण्यात आले. तर अँड.आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला लोकसभेच्या 4 जागा सोडण्याची शक्यता गृहीत धरून, इतर जागेजागांवरील उमेदवारांबाबत बैठकीत अंतिम चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी मुंबईत शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी होणा-या मविआच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल. आजच्या बैठकीचे अँड. आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आले किंवा नाही, हे समजून आले नाही. परंतु अँड. आंबेडकर यांनी मविआत अधिकृतपणे सहभागी होऊन लोकसभेच्या 4 जागा मान्य केल्या तर बैठकीनंतर कॉंग्रेसकडून अधिकृतपणे उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे.

राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकतं. मविआच्या जागा वाटपात शिवसेना (उध्दव ठाकरे) 23, कॉंग्रेस 14 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) 6 जागेवर निवडणूक लढविणार आहे. या प्रमाणात उर्वरित 5 जागेत 4 वंचित बहुजन आघाडीला आणि 1 जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला लढण्याची शक्यता आहे.

एकुण 14 जागा लढवण्यावर काँग्रेसने दिल्लीत झालेल्या बैठकीत निर्णय घेतला असून त्यातील काही नावेही बाहेर आली आहेत. परंतु कॉंग्रेसमध्येच काही नावांवर पेंच व अँड.आंबेडकरांचा मविआमधे अधिकृत समावेश यासाठी कॉंग्रेसने अधिकृतपणे काहीही जाहीर करणे टाळले आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत तातडीची बैठक होत असून शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले, शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, संजय राऊत उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीला प्रकाश आंबेडकरांना बोलावण्यात येणार आहे की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. ते सोबत आले नाहीत तर कोणाला उमेदवारी द्यायची, याबद्दलही काँग्रेसने चर्चा केली आहे.या चर्चेत अकोला लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसकडून कालच डॉ.अभय पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब मोर्तब झाला आहे. पण राजकारण म्हणजे हा खेळ सावल्यांचा! राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकतं.

हे आहेत संभाव्य उमेदवार 
गडचिराेली     नामदेव किरसान
* चंद्रपूर      विजय वडेट्टीवार
नागपूर      विकास ठाकरे
रामटेक    रश्मी बर्वे
अमरावती      बळवंत वानखेडे
*अकोला      अँड आंबेडकर/डॉ.अभय पाटील
काेल्हापूर. छत्रपती शाहू महाराज
सोलापूर    प्रणिती शिंदे 
पुणे      रवींद्र धंगेकर
नांदेड     वसंत चव्हाण
लातूर     शिवाजी काळगे
नंदुरबार      गोवाल पाडवी
भंडारा-गोंदिया     नाना पटोले
*भिवंडी     दयानंद चोरगे
*सांगली     विशाल पाटील

  • जर अँड आंबेडकर यांचा समावेश झाला नाही तर शिल्लक 4 जागा पुन्हा वाटून घेण्यात येईल.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!