Friday, April 12, 2024
Home गुन्हेगारी अखेर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

अखेर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

अकोला दिव्य न्युज ब्युरो : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली मद्य घोटाळ्यातील मनी लाँड्रिगप्रकरणी अटक करण्यात आले आहे.आज दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना कारवाईपासून दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर लगेचच रात्री ७ वाजताच्या सुमारास १० वे समन्स देण्यासाठी ईडी पथक केजरीवाल यांच्या घरी पोहोचले होते. समन्स देण्यासाठी पोहचल्यावर ईडी पथकाने छापा टाकून सर्वांचे मोबाईल जप्त केले. यासोबतच केजरीवाल यांच्याकडून डिजीटल डाटा डाऊनलोड करून, प्रश्नोत्तरे सुरू केले आणि ९ वाजताच्या सुमारास केजरीवाल यांना ताब्यात घेत, ईडी कार्यालयात नेले.

या प्रकरणात आतापर्यंत केजरीवालांना ईडीने चौकशीसाठी नऊ समन्स पाठवले, मात्र ते एकदाही हजर झाले नाहीत. यानंतर त्यांनी अटकेपासून दिलासा मिळण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण, न्यायालयानेही त्यांना दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर ही कारवाई केली. दिल्ली पोलिसांनी घराचा ताबा घेतला आणि तिथे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. ‘आप’चे नेते भारद्वाज यांना ईडीच्या पथकाला घरात येण्यापासून रोखले.दरम्यान ‘आप’च्या काही नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली.

RELATED ARTICLES

कलियुगातील दानवीर ! 8 कंपन्यांनी मागील 4 वर्षांतील नफ्यापेक्षा जास्त रोखे केले दान

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना रद्द केल्यानंतर कोणत्या पक्षाला कोणी आणि किती देणगी दिली, यासंदर्भातील...

रवी शर्मा आत्महत्या प्रकरणात हॉटेल व्हीएसच्या संचालकावर गुन्हा दाखल : आराेपीचा नागपूरात शाेध

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शुभम डेकाेरेटर्सचे संचालक व हाॅटेल व्हीएस इम्पेरियलचे रविंद्र उपाख्य रवी शर्मा यांच्या आत्महत्या प्रकरणात हाॅटेल व्हीएस इम्पेरियलचे...

२८ मार्चपर्यंत अरविंद केजरीवाल यांना ईडी कोठडी ! मद्य गैरव्यवहारप्रकरण

अकोला दिव्य न्युज ब्युरो : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली राऊस एव्हेन्यु कोर्टाने २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. काल (२१...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

राणांच्या अमरावतीत आतापासूनच मतदानाला सुरुवात; बॅलेट पेपर, ही नवी सुविधा काय? 

अकोला दिव्य न्युज ब्यूरो : कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने आयोगाने यावर्षी प्रथमच ८५ वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांसाठी...

प्रख्यात जेष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर साताऱ्यात झाली अँजिओप्लास्टी ! प्रकृती स्थिर

अकोला दिव्य न्युज ब्युरो : मराठीसह हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदेंच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. गुरुवार...

अबकी बार ‘दे-मार’ ! 100 दिवसात भाजपचा ऑनलाईन 76.87 कोटींचा खर्च : 2019 च्या तुलनेत खर्च तिप्पट

गजानन सोमाणी •एडिटर इन चीफ : सलग तिसऱ्यांदा देशातील केंद्रीय सत्तेत येण्याचा आत्मविश्वास बाळगणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेत, निवडणूक प्रचारात...

आता नागपूर-पुणे-नागपूर सुपरफास्ट समर स्पेशल आठवड्यातून तीन दिवस : आरक्षण सुरू

अकोला दिव्य न्युज ब्युरो : नागपूर-पुणे-नागपूर ही सुपरफास्ट समर स्पेशल ट्रेन आता आठवड्यातून दोन नव्हे तर तीन दिवस चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वे...

Recent Comments