Thursday, September 19, 2024
Homeक्रीडाप्रभातची गार्गी ठरली देशात दुसर्‍या क्रमांकाची बॉक्सर राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत रौप्य पदक

प्रभातची गार्गी ठरली देशात दुसर्‍या क्रमांकाची बॉक्सर राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत रौप्य पदक

अकोला दिव्य न्युज ब्युरो : प्रभात किड्स स्कूलची बॉक्सर्स गार्गी राजेश राऊत हिने नोएडा उत्तरप्रदेशमध्ये झालेल्या तिसर्‍या सबज्युनीअर गर्ल्स राष्ट्रीय बॉक्सींग चॅम्पीयनशिपमध्ये रौप्य पदक प्राप्त केले. बॉक्सींग फेडरेशन ऑफ इंडीया व उत्तरप्रदेश बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तिसर्‍या सबज्युनीयर राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप नोएडा उत्तरप्रदेश येथे आयोजित केल्या होत्या. राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये गार्गीने 55 ते 58 वजनगटात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करून आपल्या खेळाची चमक दाखविली.

सेमीफायनलमध्ये गार्गीने गुजरातची बॉक्सर्स साक्षी थापा हिला 5-0 स्कोअरने पराभूत करून रौप्य पदक प्राप्त केले.गार्गीला राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट व प्रभातचे बॉक्सिंग प्रशिक्षक राहुल वानखडे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, संचालिका वंदना नारे, सचिव निरज आवंडेकर, प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, समनव्यक मो. आसिफ व क्रीडा विभाग प्रमुख संतोष लोमटे यांच्यासह शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी गार्गीचे कौतुक केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!