अकोला दिव्य न्युज ब्युरो : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अँड प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांच्या बदलत्या भुमिकेला घेऊन वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यात येत असताना, त्यांनी रामटेक मतदारसंघातील वंचितचा उमेदवार मागे घेऊन येथे कॉंग्रेसच्या ब़ंडखोर व अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. यासोबतच वाशिम लोकसभा मतदारसंघातून आधी जाहीर करण्यात आलेला उमेदवार बदलून नवीन उमेदवार जाहीर केला.रामटेक येथून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार मागे घेण्यात आल्यानंतर, बंडखोरी करणारे गजभिये यांना माघार घेण्यास कॉंग्रेस नेते यशस्वी होणार !

वंचित बहुजन आघाडीची मविआत सहभागी होण्याची शक्यता धुसर असून, वाशिम आणि रामटेक या दोन लोकसभा मतदारसंघात त्यांनी आपली भुमिका बदलली. रामटेक मतदारसंघात उमेदवार मागे घेऊन अपक्ष उमेदवार आणि काँग्रेस बंडखोर किशोर गजभिये यांना पाठिंबा दिला. तर वाशिम लोकसभा मतदारसंघात अगोदर जाहीर करण्यात आलेली सुभाष पवार यांची उमेदवारी बदलून आता अभिजीत राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून पाच टर्म खासदार असलेल्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी भावना गवळी यांचा पत्ता कट झाला आहे. महायुतीकडून राजश्री पाटील यांना यवतमाळमधून उमेदवारी देण्यात आली आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीनेही यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून जाहीर केलेला उमेदवार बदलला आहे.

वंचितने आता सुभाष पवार यांच्या जागेवर अभिजीत राठोड हे नवे उमेदवार असल्याचं जाहीर केलं आहे.अभिजीत राठोड यांनी आज वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.अभिजीत राठोड हे वंचित बहुजन आघाडीचे मंगरूळपीर व मानोरा तालुक्यातील प्रमुख नेते असून, उध्दव ठाकरे शिवसेनेसोबत जोडलेल्या वंजारी समाजाच्या मतदानाचे विभाजन करण्यासाठी राठोड यांना उमेदवारी देण्यात आली काय ? रामटेक येथून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार मागे घेण्यात आल्यानंतर बंडखोरी करणारे गजभिये यांना माघार घेण्यास कॉंग्रेस नेते यशस्वी होईल काय ? सध्यातरी रामटेक मतदारसंघात कॉंग्रेसच्या अडचणीत वाढ झाली.