Saturday, July 27, 2024
Homeन्याय-निवाडाआजची मोठी बातमी ! नवनीत राणा यांना दिलासा की धक्का : काही...

आजची मोठी बातमी ! नवनीत राणा यांना दिलासा की धक्का : काही तासांतच निकाल ?

गजानन सोमाणी : अमरावती लोकसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत विजयी झालेल्या आणि भाजपकडून २०२४ च्या लोकसभा निवडणुक रिंगणात असलेल्या नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण होऊन न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठाने राखून ठेवलेला निकाल आज गुरुवार ४ एप्रिल रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आज ४ एप्रिल रोजीच्या कामकाजात या प्रकरणाचा समावेश आहे. त्यामुळे कामकाजाच्या पहिल्या टप्प्यात निकाल होऊ शकतो.सुप्रीम कोर्टाच्या निकालपत्रात नवनीत राणा यांना दिलासा मिळणार की धक्का बसणार हे लवकरचं स्पष्ट होईल.

मुंबई हायकोर्टानं २०२१ मध्ये नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द ठरवलं होतं. राणा यांनी हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर कोर्टानं निकाल राखून ठेवला. सुप्रीम कोर्टात आजच्या तारखेतील कामकाजात या प्रकरणाचा समावेश असून फक्त निकाल देणे, एवढेच शिल्लक आहे. त्यामुळे सर्वचे लक्ष याकडे लागले आहे.

अमरावतीची जागा अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघातून विजयी झालेल्या नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई हायकोर्टानं २०२१ मध्ये रद्द ठरवलं होतं. राणा यांनी हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

या सुनावणीनंतर कोर्टानं निकाल राखून ठेवला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं देखील या प्रकरणात बाजू मांडण्यात आली. सुप्रीम कोर्टाच्या निकालपत्रात नवनीत राणा यांना दिलासा मिळणार की धक्का बसणार हे लवकरचं स्पष्ट होईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!