Sunday, June 16, 2024
Homeराजकारणमोठी बातमी : प्रकाश आंबेडकर, महादेव जानकरांना मिळालं नवं निवडणूक चिन्ह

मोठी बातमी : प्रकाश आंबेडकर, महादेव जानकरांना मिळालं नवं निवडणूक चिन्ह

अकोला दिव्य न्युज ब्युरो : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात आलं आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरलेल्या प्रकाश आंबेडकर यांना प्रेशर कुकर हे चिन्ह देण्यात आलं असून रासपचे अध्यक्ष आणि परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना शिट्टी हे चिन्ह देण्यात आलं आहे. तसंच बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून अमरावती मतदारसंघातून शड्डू ठोकलेल्या दिनेश बूब यांनाही शिट्टी हे चिन्ह देण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात यंदाची निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन प्रादेशिक पक्ष फुटून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या दोन नव्या पक्षांना मान्यता देण्यात आली असून त्यांना नवे निवडणूक चिन्हही देण्यात आलं आहे. अशातच इतर छोट्या पक्षांना अद्याप निवडणुकीसाठी पक्षचिन्ह देण्यात आलं नसून त्या पक्षांच्या उमेदवारांना वेगवेगळ्या चिन्हांचं वाटप निवडणूक आयोगाकडून करण्यात येतं. आयोगाने आज ही प्रक्रिया पूर्ण करत छोट्या पक्षांच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी चिन्हांचं वाटप केलं आहे.

अकोल्यात ‘प्रेशर’ वाढणार की ?परभणीत जानकरांची ‘शिट्टी’ वाजवणार की

लोकसभा निवडणुकीत अकोला मतदारसंघ कॉंग्रेस आणि अँड प्रकाश आंबेडकर यांच्यातील जागा वाटपासाठीच्या ‘हाय व्होल्टेज’ नाट्यानंतर अँड आंबेडकर आणि डॉ.पाटील रिंगणात कायम आहेत. यंदा शेवटपर्यंत बाळासाहेब आणि कॉंग्रेस यांचं जमणार असं बहुतेकांना वाटत होते. शेवटपर्यंत मतदारांवरही ‘प्रेशर’ होतं आणि आताही आहे. यावेळी अँड आंबेडकर यांना यंदा निवडणूक चिन्ह ‘प्रेशर कुकर’ मिळाले असून प्रेशर कुकर मध्ये डाळ शिजणार ? मतदानासाठीचे जातीय समीकरण लक्षात घेऊन नवीन चेहरा मैदानात उतरवला असल्याने यंदा ‘पंजा’ चा दबाव व दबदबा होईल? हे ४ जूनला कळेल. मात्र २०२४ ची निवडणूक काट्याची होईल, यांत शंका नाही.

परभणी लोकसभा मतदारसंघा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुन्हा एकदा विद्यमान खासदार संजय जाधव यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली आहे. मात्र निवडणूक आयोगाने शिवसेना हा मूळ पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवल्याने खासदार जाधव यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल या नव्या चिन्हासह लढाईच्या मैदानात उतरवं लागलं आहे. त्यांच्याविरोधात महायुतीचे उमेदवार असणाऱ्या महादेव जानकर यांना आता शिट्टी हे चिन्ह मिळालं असून परभणीत काँटे की टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!