Saturday, July 27, 2024
Homeताज्या घडामोडीनाना पटोलेंच्या कारला अपघात ! उभ्या गाडीला भारधाव ट्रकची धडक

नाना पटोलेंच्या कारला अपघात ! उभ्या गाडीला भारधाव ट्रकची धडक

अकोला दिव्य न्युज ब्युरो : प्रचारसभा आटोपून परत येत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारचा भीषण अपघात झाला. भंडारा शहरालगतच्या भिलेवाडा गावाजवळ मध्यरात्री ही दुर्घटना घडली असून यात कारचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

भंडारा शहरालगतच्या भिलेवाडा गावाजवळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारचा मंगळवारी भीषण अपघात झाला. नाना पटोले मंगळवारी आपली सुनिश्चित प्रचारसभा आटपून सुकळी या गावी जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास मागून येणाऱ्या ट्रकने त्याच्या उभ्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने मोठी घटना टळली. नाना पटोले हेदेखील थोडक्यात बचावले.

अपघाताची माहिती मिळातच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. पुढील तपास सुरू आहे. ट्रकचालकाचे ट्रकवरील नित्रंयण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!