Saturday, December 14, 2024
Homeताज्या घडामोडीभाजपला मोठा धक्का ! मोहिते पाटलांची घरवापसी : पवारांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जाही...

भाजपला मोठा धक्का ! मोहिते पाटलांची घरवापसी : पवारांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जाही भरणार

अकोला दिव्य न्युज ब्युरो : गेल्या अनेक दिवसांपासून अकलूजच्या मोहिते पाटील कुटुंबाबाबत राजकीय वर्तुळात जी चर्चा सुरू होती त्या चर्चेवर शिक्कामोर्तब होणार, हे आता अखेर निश्चित झालं आहे. मोहित पाटील कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी आज सकाळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली असून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशाविषयी या भेटीत चर्चा करण्यात आली. अकलूजमधील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे १३ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होईल आणि या पक्षप्रवेश सोहळ्याला विजयसिंह मोहिते पाटील आणि जयसिंह मोहिते पाटीलही उपस्थित राहतील.अशी माहिती शरद पवारांच्या भेटीनंतर मोहिते पाटलांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. मोहिते पाटील कुटुंबीय घरवापसी करणार असल्याने भाजपसाठी पश्चिम महाराष्ट्रात हा मोठा धक्का मानला जात आहे.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आज लोकसभा निवडणुकीसाठी आपली तिसरी उमेदवार यादी जाहीर करत सातारा आणि रावेर मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा केली. महाविकास आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला दहा जागा आल्या असून पहिल्या दोन याद्यांमध्ये सात आणि आज दोन उमेदवार जाहीर करत पवारांच्या राष्ट्रवादीने आतापर्यंत एकूण ९ उमेदवारांची घोषणा केली आहे. आता पक्षाकडून केवळ माढा मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा होणं बाकी आहे. या घोषणेलाही आता अखेर मुहूर्त मिळाला असून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळीच त्यांच्या उमेदवारीचीही घोषणा होणार असल्याचे समजते.

तसंच १६ एप्रिल रोजी शरद पवारांच्या उपस्थितीतच ते माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!