Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्याअबकी बार 'दे-मार' ! 100 दिवसात भाजपचा ऑनलाईन 76.87 कोटींचा खर्च...

अबकी बार ‘दे-मार’ ! 100 दिवसात भाजपचा ऑनलाईन 76.87 कोटींचा खर्च : 2019 च्या तुलनेत खर्च तिप्पट

गजानन सोमाणी •एडिटर इन चीफ : सलग तिसऱ्यांदा देशातील केंद्रीय सत्तेत येण्याचा आत्मविश्वास बाळगणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेत, निवडणूक प्रचारात धुमाकूळ घातला आहे. प्रचार व प्रसाराच्या प्रत्येक माध्यमातून विरोधी पक्षांना नामोहरम करताना अवघ्या 100 दिवसांत एकट्या ऑनलाइन जाहिरातींवर अधिकृतपणे ३८.७ कोटी रुपये खर्च केले आहेत. याच काळात केंद्र सरकारच्या संचार विभागाने केलेल्या जाहिरातींचा खर्च 32.3 कोटी रुपये आहे. हा खर्च केंद्रातील सरकारसाठी केला आहे. मात्र सरळ संबंध भाजपाच्या प्रचारासाठी आहे.( हा पैसा सरकारी तिजोरीतून झाला) या खर्चाची भर घातल्यास भाजपचा 100 दिवसात जाहिरात खर्च 70 कोटी रुपये झाला आहे. वर्ष 2019 मध्ये या कालावधीत झालेल्या खर्चाच्या तुलनेत यंदा पक्षाचा खर्च आताच तिप्पट झाला असून त्यात आणखी वाढ होणार आहे.

भाजपचा डिजिटल जाहिरातींवर नेहमीच भर राहिला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही ऑनलाइन प्रचार जाहिरातींसाठी भाजपने सढळ हस्ते खर्च केल्याचे दिसून येते. ‘गूगल’वर नोंद केल्या जाणाऱ्या आकडेवारीनुसार 1 जानेवारी ते 9 एप्रिल 2024 या काळात भाजपने 38.7 कोटी रुपये जाहिरातींवर खर्च केले, तर फेसबुक, इन्स्टा या अ‍ॅपची कंपनी असलेल्या ‘मेटा’वर जाहिरातींचा अधिकृत खर्च 6 कोटी 77 लाख रुपयांच्या आहे. लोकसभा निवडणुकीचे वर्ष असल्याकारणाने गेल्या काही महिन्यांपासून भाजपकडून मोठ्या प्रमाणात जाहिराती केल्या जात आहेत.

या दरम्यान केंद्रीय संचार विभागाच्या (पूर्वीच्या डीएव्हीपी) माध्यमातून 32.3 कोटी रुपये ‘मोदी सरकार की गॅरंटी’ या जाहिरात मोहिमेवर खर्च करण्यात आल्याचेही दिसून येते. विशेष म्हणजे, 2019 मध्ये 1 जानेवारी ते 31 मे या कालावधीत भाजपने सव्वाबारा कोटी रुपये खर्च केले होते. त्या तुलनेत यंदा पक्षाचा खर्च आताच तिप्पट झाला असून त्यात आणखी वाढ होणार आहे. ‘गूगल’वर अधिकृतपणे नोंदणी केलेल्या जाहिरातींच्या खर्चाची ही आकडेवारी असून विविध सामाजिक संस्था तसेच जाहिरात कंपन्यांमार्फत अप्रत्यक्षपणे करण्यात येणाऱ्या प्रचार जाहिरातींवरील खर्चाचा आकडा याहून किती तरी पट अधिक असू शकतो.प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचा खर्च जेमतेम काही कोटी रुपये आहे.

भाजपचे लक्ष उत्तर प्रदेश व ओडिशावर ?

‘गूगल’च्या अहवालात पक्षांकडून करण्यात येणाऱ्या जाहिरातींचे राज्यनिहाय वर्गीकरणही उपलब्ध होते. त्याआधारे एखादा पक्ष कोणत्या राज्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे, तेही समजू शकते. त्यानुसार भाजपने सर्वाधिक खर्च उत्तर प्रदेशमध्ये जाहिरात प्रसारणावर केला. मात्र त्याखालोखाल पक्षाचा सर्वाधिक खर्च ओडिशावर आहे. दुसरीकडे, काँग्रेसच्या जाहिरातींचा प्रसार प्रामुख्याने महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये अधिक आहे.

जाहिरातींतून हल्ले-प्रतिहल्ले

भाजपने ‘फिर एक बार, मोदी सरकार’चा नारा देत ही घोषणा विविध भाषांमध्ये देणारे प्रचारगीत मार्चच्या दुसऱ्या पंधरवडय़ात यूटय़ूबवरून प्रसारित केले. मोदी सरकारच्या विकासकामांचा पाढा वाचताना या जाहिरातीत महिला वर्गाला प्रामुख्याने केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.

’काँग्रेसने ‘हाथ बदलेगा हालात’ आणि ‘मेरे विकास का दो हिसाब’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून जाहिरातींत परीक्षा घोटाळा, महागाई, बेरोजगारी या समस्यांवर प्रकाश पाडण्याचा प्रयत्न केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!