Saturday, October 5, 2024
Homeगुन्हेगारीबहुचर्चित तुषार पुंडकर हत्याकांडातील आरोपी स्वप्नील नाठेचा तिसऱ्यांदा दाखल जमीन अर्ज फेटाळला

बहुचर्चित तुषार पुंडकर हत्याकांडातील आरोपी स्वप्नील नाठेचा तिसऱ्यांदा दाखल जमीन अर्ज फेटाळला

अकोला दिव्य न्युज ब्यूरो : प्रहार संघटनेचे माजी जिल्हा प्रमुख तुषार पुंडकर बहुचर्चित हत्याकांडातील आरोपी शाम उर्फ स्वप्नील नाठे (वय 25) याचा या प्रकरणातील दाखल केलेला तीसरा जमानत अर्ज अकोट येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश चकोर बावीसकर यांनी फेटाळला आहे.अकोट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक.80/2020 भा.द.वि. 302 व इतर कलमांतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपी नाडे हा 26 मार्च 2020 पासून अटकेत असुन जिल्हा कारागृहात बंदीस्त आहे.

या प्रकरणात सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी या जमानत अर्जावर न्यायालयात लेखी उत्तर दाखल केले व युक्तीवाद केला की 21 फेब्रुवारी 2020 रोजी रात्री 10 वाजताचे सुमारात पोलीस वसाहत अकोट येथे गावठी पिस्तुल मधुन तुषार पुंडकर यांचेवर गोळीबार करून त्यांचा खून करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी शाम उर्फ स्वप्नील नाठे व इतर सहा आरोपींनी कट कारस्थान करून तुषार पुंडकर यांचा खुन केला. कट रचल्याची माहिती लपवुन ठेवली व रचलेल्या कटप्रमाणे या प्रकरणातील आरोपी अल्पेश दूधे व श्याम नाठे यांनी तुषार पुंडकर यांचेवर पाळत ठेवून दि. 21/02/2020 चे रात्री 10 वाजताचे सुमारास पोलीस तपासात निष्पन्न झाल्याप्रमाणे अर्जदार आरोपी श्याम नाठे यांनी गावठी पिस्तुल मधुन तुषार पुंडकर याला जिवानीशी ठार मारण्याच्या उद्देशाने त्याचे डोक्यात एक गोळी झाडली आणि त्यामुळेच तुषार पुंडकरचा खुन झाला हे सिध्द झाले आहे. या आरोपीला जामीन दिल्यास तो या प्रकरणातील साक्षीदारांवर दबाव आणु शकतो किंवा साक्षीदारांच्या जिवीतास हानी सुध्दा पोहचवू शकतो.

अशा गुन्हामध्ये फाशीसारखी शिक्षा असुन गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. त्यामुळे आरोपी पळून सुध्दा जावू शकतो. या प्रकरणात आरोपी विरुध्द सबळ पुरावे उपलब्ध आहेत. तसेच या आरोपीला मुंबई उच्च न्यायालय नागपुर खंडपीठ व सर्वोच्च न्यायालय येथे देखील जमीन मिळालेली नाही. तत्कालीन परिस्थीती आणि आता कुठल्याही प्रकारचा बदल या प्रकरणात झालेला नाही. त्यामुळे आरोपीचा जमानत अर्ज नामंजुर करण्यात यावा, असा युक्तीवाद सरकार तर्फे सरकारी वकील अजीत देशमुख यांनी केला. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर विद्यमान न्यायालयाने आरोपीचा जमानत अर्ज नामंजुर केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!