Sunday, June 16, 2024
Homeअर्थविषयकहिरे व्यापाऱ्यांची पाठ ! जगातील सगळ्यात मोठा 'सूरत डायमंड बोर्स' झाला भूत...

हिरे व्यापाऱ्यांची पाठ ! जगातील सगळ्यात मोठा ‘सूरत डायमंड बोर्स’ झाला भूत बंगला : अनेकजण पुन्हा मुंबईत

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : अवघ्या काही महिन्यांपूर्वी चर्चेत आलेल्या गुजरातमधील सूरत डायमंड बोर्सला अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने जगातल्या या सगळ्यात मोठ्या कार्यालयाची स्थिती भूत बंगल्यासारखी झाली आहे. हिरे व्यापाऱ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र निर्माण झालं आहे. त्यामुळेच आता भारत डायमंड बोर्सनं आपली विस्तार योजना राबविण्यास सुरुवात केली आहे.

सूरत डायमंड बोर्सची स्थापना ही मुंबई ते सूरतपर्यंत हिरे व्यापाराचा विस्तार करण्याच्या उद्देशाने सूरत डायमंड बोर्सची स्थापना ही करण्यात आली होती. सूरत शहरातील खजोद गावात डायमंड रिसर्च अँड मर्केंटाइल (ड्रीम) सिटीचा भाग म्हणून ३५.५४ एकर जमिनीवर बांधलेली आणि ६७ लाख चौरस फूट मजल्यावरील जागा असलेली ही जगातील सर्वात मोठी निवासी इमारत आहे. गेल्या वर्षी डिसेंबर २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते SDB चे उद्घाटन करण्यात आले होते. उद्घाटन समारंभात १३० हून अधिक कार्यालये उघडण्यात आली आणि केवळ तीन महिन्यांत ही कार्यालये बंद पडू लागली. सध्या एसडीबीमध्ये फक्त तीन कार्यालये सुरू आहेत. बँका आणि इतर कार्यालये (डायमंड नसलेली कार्यालये) उघडी आहेत, परंतु ते देखील त्यांना परवडत नसल्याचे एका व्यापाऱ्यांनी सांगितले.

सूरत डायमंड बोर्समध्ये ३०० स्क्वेअर फुटांपासून ७५०० स्क्वेअर फुटांपर्यंत प्रत्येकी सुमारे ४२०० ऑफिसेसची क्षमता आहे. सूरत डायमंड बोर्समध्ये एकूण नऊ टॉवर्स आहेत, प्रत्येकी ग्राऊंड प्लस १५ मजले आहेत.काही दिवसांपूर्वीच राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार व सूरतचे प्रमुख हिरे व्यापारी असलेल्या गोविंद ढोलकिया यांनी काही दिवसांपूर्वीच सूरत डायमंड बोर्सचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. त्यानंतर त्यांच्या टीमने महिधरपुरा येथील हिरे व्यापाऱ्यांशीही संपर्क साधला. त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी नव्या बाजाराकडे स्थलांतरित होण्याचं महत्त्वही पटवून दिले. ढोलकिया यांच्याबरोबर सूरत डायमंड बोर्सचे उपाध्यक्ष नागजी साकारियासुद्धा होते. खरं तर. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सूरत डायमंड बोर्स(SDB)च्या नव्या व्यवस्थापन मंडळाने सूरतच्या मध्यभागी असलेल्या महिधरपुरा येथील पारंपरिक हिरे व्यापाऱ्यांना खजोद येथून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या सूरत डायमंड बोर्समध्ये स्थलांतरित करण्यासाठी त्यांची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे मुंबईतील भारत डायमंड बोर्सच्या माध्यमातूनच ही मोहीम राबवली जात असून, बाजारातील नव्या व्यावसायिकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

महिधरपुरा हिरे व्यापाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर SDB समितीच्या सदस्यांनी शुक्रवारी कटरगामच्या भागात हिरे व्यापारी आणि उत्पादक यांच्याबरोबर आणखी एक बैठक घेतली. या बैठकीला हिरे व्यापारी आणि कारखानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. एसडीबी येथे कार्यालये सुरू करण्याचे आवाहन समिती सदस्यांकडून करण्यात आले. SDB समितीचे सदस्य १८ एप्रिल रोजी मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांशी अशाच बैठका घेणार आहेत. तसेच ज्यांनी SDB येथे कार्यालये खरेदी केली आहेत, त्यांना लवकरच SDB येथे कार्यालये सुरू करण्याची विनंती केली जाणार आहे. ढोलकिया, लालजी पटेल आणि कोअर कमिटीच्या इतर सदस्यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात एसडीबी येथे कार्यालये उघडण्याची योजना आखली आहे. दरम्यान, शुभ दिवशी ७ जुलै रोजी त्यांचे कार्यालय उघडण्याची त्यांची योजना आहे. जवळपास ५०० व्यापारी जुलैमध्ये SDB मधील कार्यालयात त्यांचे व्यवसाय सुरू करतील, अशी अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!