Thursday, September 19, 2024
Homeगुन्हेगारीगोळीबार ! मणिपूरमध्ये मतदान केंद्रावर तीन मतदारांचा मृत्यू

गोळीबार ! मणिपूरमध्ये मतदान केंद्रावर तीन मतदारांचा मृत्यू

अकोला दिव्य न्युज ब्युरो : लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात देशात १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये आज (१९ एप्रिल) मतदान पार पडत आहे. यामध्ये मणिपूरच्या दोन मतदारसंघात (मणिपूर आणि मणिपूर बाह्य) मतदान होत आहे. या मतदानादरम्यान मणिपूरमधील मोइरांग विभागातील थामनपोकपी येथील एका मतदान केंद्रावर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबाराचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

थामनपोकपी येथील मतदान केंद्रावर गोळीबार झाल्यामुळे मतदान करण्यासाठी आलेल्या लोकांमध्ये मोठी घबराट पसरली असून व्हायरल झालेल्या एका व्हिडीओ गोळीबाराचा आवाज येत आहे. तसेच मतदान केंद्राबाहेर लोक पळत असल्याचे दिसत आहे. २५ सेकंदांचा हा व्हिडीओ असून यामध्ये गोळीबाराचा आवाज येण्याआधी मोठा गोंधळ सुरु असल्याचे दिसत आहे. या गोळीबारात तीनजण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.

मोइरांग विभागातील थामनपोकपी येथील गोळीबाराच्या घटनेनंतर याठिकाणी अधिक प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याबरोबरच मणिपूरच्या इम्फाळ पूर्व येथील एका मतदान केंद्रावर ईव्हीएमची तोडफोड झाल्याचीही माहिती समोर आली आहे. दरम्यान, मणिपूरमध्ये गेल्या वर्षीपासून हिंसाचार सुरु असल्याचे पाहायला मिळते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!