Saturday, October 5, 2024
Homeताज्या घडामोडीमोठी बातमी ! फक्त 53 टक्के मतदान : लढत दुहेरी वळणावर ?...

मोठी बातमी ! फक्त 53 टक्के मतदान : लढत दुहेरी वळणावर ? कमी टक्केवारीचा फटका कोणाला

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला लोकसभा मतदारसंघात सायंकाळी सहा वाजता संपलेल्या मतदानाची सरासरी टक्केवारी 52.69 टक्के असल्याची माहिती अकोला निवडणूक विभागाने जाहीर केली आहे. हा प्राथमिक अंदाज असून रात्री उशिरा निश्चित टक्केवारी घोषित करण्यात येणार आहे.पण यामध्ये अधिकाधिक 1 किंवा 2 किंवा 2 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होण्याची शक्यता नाही. वर्ष 2014 मध्ये 58 टक्के मतदान झाले होते.त्या तुलनेत यंदा 5 टक्के आणि 2019 मध्ये 60 टक्के झालेल्या मतदानाच्या तुलनेत यंदा जवळपास 7 टक्के मतदान कमी झाले आहे.कमी झालेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार आहे. हे 4 जुनला जाहीर करण्यात येणाऱ्या निकालातून दिसून येईलच.पण भाजपचे परंपरागत मतदारांचे मतदान कमी झाल्याने टक्केवारी घसरली असल्याचा दावा केला जात आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी 47.38 टक्के मतदान झाले आहे. तर सर्वात जास्त 57.65 टक्के मतदान बाळापूर विधानसभा मतदारसंघात झाले आहे. या मतदारसंघात शिवसेनेचा आमदार असून, कॉंग्रेसचे आमदार असलेल्या मालेगाव-रिसोड विधानसभा मतदारसंघात 53.79 टक्के मतदान झाले आहे. यासोबतच भाजपचे आमदार असलेल्या मुर्तिजापूर 56.93 टक्के तर अकोट विधानसभा मतदारसंघात 52.30 आणि अकोला पुर्व मतदारसंघात 49.10 टक्के मतदान झाले आहे. अकोला पश्चिम आणि पुर्व मतदारसंघला भाजपचा बालेकिल्ला म्हटले जाते आणि या दोन्ही मतदारसंघांत 50 टक्क्यांपेक्षा कमी झालेल्या मतदानाचे नेमका कारण काय? अशी चर्चा चालु झाली आहे. यंदा रिसोड मतदारसंघ सुरुवाती पासूनच कॉंग्रेसकडे झुकला असल्याचे दिसून येत होते.

यंदा कॉंग्रेसला येथून मताधिक्य मिळणार असल्याची चर्चा आहे. तर अकोट मतदारसंघांतील जातीय समीकरणे लक्षात घेता, हा मतदारसंघ भाजप धार्जिणा मानल्या जातो.परंतु गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा टक्केवारी कमी झाली आहे. तसेच अकोला-अकोट महामार्गावरुन सत्ताधारी भाजप आणि आमदार भारसाकळे यांच्याबद्दल मोठा असंतोष पसरला होता. मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील अनेक गावात आमदार हरीश पिंपळे यांच्याबद्दल असंतोष असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेनेचा सक्रिय सहभाग कॉंग्रेसची जमेची बाजू होऊ शकते. मुसलमान समाजात केवळ कॉंग्रेस अशी भुमिका घेतली आणि त्या प्रमाणे मुस्लिम मतदारांनी मतदान केले असल्याची ग्वाही मतदार देत आहेत. तर मुस्लिम समाजाचेही अपेक्षा पेक्षा कमी मतदान झाले असल्याचे दिसून येत आहे. तर ‌चुरशीचा होणारा हा सामना दुरंगी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!