Thursday, September 19, 2024
Homeताज्या घडामोडीराहुल गांधी यांनी रायबरेली का निवडले ? प्रियांका निवडणूक का लढत नाहीत...

राहुल गांधी यांनी रायबरेली का निवडले ? प्रियांका निवडणूक का लढत नाहीत ?

अकोला दिव्य न्युज ब्युरो: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आणि देशाच्या मीडियाने अवघा माहोल करून टाकलेल्या उत्तर प्रदेशातील सर्वाधिक प्रतिष्ठित अमेठी आणि रायबरेलीतून उमेदवार जाहीर केले आहेत. आता राहुल गांधी यांनी अमेठी सोडून रायबरेलीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरु झाली आहे. रायबरेलीवर नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघावर नेहरुंपासून पगडा आहे. त्यामुळे आता अमेठीतून राहुल गांधी यांनी माघार घेतल्याने टीकाही सुरु झाली आहे. मात्र, राहुल गांधी यांनी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत पुन्हा फोकस कायम ठेवला आहे.

राहुल गांधी यांनी घेतलेल्या निर्णयाचे राजकीय अर्थ काय? त्यांना अमेठीतून पराभवाची भिती होती का? अमेठीत जोरदार तयारी सुरु असताना मोर्चा रायबरेलीत का गेला? असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. 2019 मध्ये अमेठीतून दोन वेळा खासदार राहिलेल्या राहुल गांधी यांचा अमेठीत 55 हजारहून अधिक मतांनी पराभव झाला होता. 2004 पासून रायबरेलीच्या खासदार असलेल्या सोनिया यांनी ती जागा कायम राखली आहे. 2019 मध्ये यूपीमधून काँग्रेसने जिंकलेली एकमेव ती जागा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी रायबरेली निवडमागे काय कारणे असू शकतात.

राजकीय उंची असलेल्या विरोधी नेत्याशी लढण्यास स्मृती इराणी पात्र नसल्याचा संकेत दिले आहेत. तुलनेत काँग्रेसचे निष्ठावंत केएल शर्मा लढत देऊ शकतात. स्मृती इराणींना ही लढत सोपी असली, तरी निश्चितच हलक्यात घेता येणार नाही.

रायबरेलीतून निवडणूक लढवणे म्हणजे खऱ्या अर्थाने सोनिया गांधींचा शब्द मानणे. उत्तर प्रदेश या महत्त्वाच्या राज्यात निवडणुकीच्या रिंगणात उतरून आपले अस्तित्व जाणवून देणे. मित्रपक्ष समाजवादी पक्षालाही राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवावी अशी इच्छा होती. काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी चांगला संदेश गेला आहे.
राहुल गांधी आता संपूर्ण भारत मोहिमेवर लक्ष केंद्रित करू शकतात. कारण त्यांच्याकडे इंडिया आघाडीचा विजय सुनिश्चित करण्याची मोठी जबाबदारी आहे. राहुल गांधी यांनी वारंवार वायनाड सोडणार नसल्याचे म्हटले आहे.

राहुल गांधींच्या विजयानंतर, प्रियंका गांधी रायबरेलीमधून पोटनिवडणूक लढवू शकतात. त्यांच्या आईचा म्हणजेच सोनिया गांधींचा वारसा पुढे नेऊ शकतात. इंदिरा गांधींनी भूतकाळात जे केले होते त्याप्रमाणे ही राजकीयदृष्ट्या धोरणात्मक चाल असू शकते. त्यानंतर प्रियांका गांधी उत्तर प्रदेशात लक्ष केंद्रित करू शकतात. ऐनवेळी राहुल गांधी यांनी रायबरेली निवडून भाजपला सुद्धा अमेठीमधील तयारीवर पुन्हा एकदा विचार करण्यास भाग पाडल्याची चर्चा आहे. अमेठीतून इराणींविरोधात केएल शर्मा यांना पूर्ण ताकदीने निवडणूक लढवण्यास पाठबळ देण्याचा हेतू असू शकतो.
प्रियांका गांधी निवडणूक का लढत नाहीत?
जयराम रमेश यांनी पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाचे समर्थन करत म्हटले की, त्या कोणतीही पोटनिवडणूक लढवून संसदेत पोहोचू शकते, परंतु यावेळी त्या जोरदार प्रचार करत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रत्येक खोट्याला उत्तर देत आहेत. रमेश म्हणाले की, राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्यांवर अनेकांची मते भिन्न आहेत, पण ते राजकारण आणि बुद्धिबळाचे अनुभवी खेळाडू आहेत आणि विचारपूर्वक आपली वाटचाल करतात. मोठ्या रणनीतीचा भाग म्हणून पक्ष नेतृत्वाने बराच विचारविनिमय केल्यानंतर हा निर्णय घेतला

Oplus_131072
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!