Thursday, September 19, 2024
Homeअर्थविषयकडाॅ. लोखंडे यांचे आवाहन ! अवैध सावकारी निर्मुलनासाठी सहकारी पतसंस्था चळवळ महत्वाची...

डाॅ. लोखंडे यांचे आवाहन ! अवैध सावकारी निर्मुलनासाठी सहकारी पतसंस्था चळवळ महत्वाची : जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे प्रशिक्षण

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शेतकरी आत्महत्याग्रस्त अकोला जिल्ह्यातील अवैध सावकारी निर्मुलनासाठी अधिकाधिक सहकारी पतसंस्थाची नोंदणी करणे आवश्यक आहे.यासाठी जिल्ह्यात सहकारी पतसंस्था स्थापनेस चालना देण्यासाठी चळवळ उभी करावयास पुढाकार घ्यावा, असे आवाहन अकोल्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डाॅ प्रविण लोखंडे यांनी केले.

अकोला जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांचे संयुक्त विद्यमाने अकोला जिल्हयातील पतसंस्थेच्या कर्मचा-यांसाठी अकोला येथे एक दिवशीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणुन जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी अकोला जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष नारायणराव अवारे होते.कार्यकमाचे प्रमुख अतिथी म्हणुन प्रा. मुकुंद भारसाकळे यांची उपस्थिती होती. सुरुवातीला जिल्हा उपनिबंधक प्रविण लोखंडे व जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष नारायणराव अवारे आणि मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तदनंतर प्रशिक्षण कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली.

सर्वप्रथम सनदी लेखापाल रमेश चौधरी यांनी “पतसंस्थाकरीता आयकर कायद्यातील तरतुदी” या विषयावर उत्कृष्ट विवेचन केले. त्यानंतर सेवानिवृत्त सहाय्यक निबंधक श्रीकांत खाडे यांनी “सहकार कायदा व नियमातंर्गत संचालकांच्या जबाबदा-या” या विषयावर प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले. सनदी लेखापाल घनश्याम चांडक यांनी “सहकारी पतसंस्थांचे अंतीम लेखे व अंकेक्षण” या विषयावर मार्गदर्शन केले. भोजनानंतर व्दितीय सत्राला सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी व्यवस्थापक आर. एस. बोडखे यांनी “कर्जवाटप करतांना घ्यावयाचे दस्तऐवज” या विषयावर मार्गदर्शन केले.

अंतीम सत्रात जिल्हा बँकेचे माजी सरव्यवस्थापक व सहकार क्षेत्रातील तज्ञ बाळकृष्ण काळे यांनी “रोखता व तरलता काढण्याची कार्यपध्दती” या विषयावर अभ्यासपुर्वक विवेचन केले. याप्रसंगी उपस्थित विविध पंतसंस्थाचे अध्यक्ष नारायणराव अवारे, जानकीराम वाकोडे, ललीत काळपांडे, उध्दराव विखे, रवि पाटणे, बी जे काळे, पवनीकर साहेब, अशोक नरवाणी, दिनकर घोरड, संजीव जोशी, गणेशराव देशमुख, यांचा जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी विविध पतसंस्थांचे अध्यक्ष, विविध पतसंस्थाचे कर्मचारी, अधिकारी, निशांत पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बाभुळकर, गजानन नागरी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकिशोर अवारे, जिल्हा फेडरेशनचे उपाध्यक्ष रवि पाटणे, उध्दवराव विखे, विनोद मनवाणी, डॉ. विवेक हिवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तावीक बि.जे. काळे तर संचालन मुरलिधर कारस्कर यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!