अकोला दिव्य न्युज ब्युरो : चेहऱ्यावरील आजारांसाठी आलेल्या महिलेसोबत अश्लिल चाळे करीत विनयभंग केल्याप्रकरणाची तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेला सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात दमदाटी करून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केल्याचा प्रकार घडकीस आला.दरम्यान प्रसारमाध्यमांसमोर पिडीत महिलेनी आपबिती सांगितल्याने तब्बल 4 दिवसांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणात पोलिसांनी खिशे गरम केल्याचीही चर्चा आहे.
अकोल्यातील जठारपेठ भागात असलेल्या चाइल्ड अँड ब्युटी केअर होमिओपॅथी क्लिनीकला उपचारासाठी आलेल्या महिलेची तपासणी करताना डॉ.अग्रवाल यांनी अश्लिल चाळे करीत विनयभंग केल्याचे महिलेने आपल्या भावाला सांगितले. यानंतर दवाखान्यात गोंधळ उडाला. महिलेचा भाऊ आणि डॉक्टर यांच्यात शाब्दिक वाद झाला.
पिडीत महिलेनं तिच्या ३ वर्षाच्या मुलासह सरळ सिव्हिल लाईन पोलिस ठाणे गाठले. मात्र तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेला रात्री उशिरापर्यंत ताटकळत ठाण्यात बसवून ठेवले. उलट महिलेला तिच्यावरच कारवाई करण्याची धमकी दिली. दरम्यान महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. मात्र पोलिसांचा खिशा गरम झाला की काय, पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली.शेवटी मुलगा रडत असल्याने महिला पोलिस ठाण्यातून घरी आली. असा आरोप महिलेनं प्रसार माध्यमांसमोर केला.
सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात हनुमान जयंतीच्या दिवशी हा प्रकार घडला.पण या प्रकरणाची पोलिस ठाण्यात दबक्या आवाजात चर्चा केली जात होती. अखेर प्रसारमाध्यमांकडून विचारणा केली जाऊ लागली. तेव्हा 4 दिवसांनंतर डॉ.अग्रवालवर गुन्हा दाखल करण्यात आला.