Sunday, June 16, 2024
Homeअपघातअकोल्यात मन सुन्न करणारी घटना ! 7 वर्षाच्या मुलीचा कुलरमधिल विजेचा धक्का...

अकोल्यात मन सुन्न करणारी घटना ! 7 वर्षाच्या मुलीचा कुलरमधिल विजेचा धक्का लागून मृत्यू

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शिवसेना वसाहत परिसरातील रहीवासी माजी नगरसेवक अमाेल गाेगे यांची ७ वर्षीय मुलगी युक्ती घरात लावलेल्या कुलरजवळ खेळत असतांना या कुलरमधील विजेचा धक्का लागल्याने युक्तीचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.

शिवसेना वसाहत येथील रहीवासी माजी नगरसेवक अमाेल गाेगे यांची ७ वर्षीय मुलगी युक्ती ही घराजवळ खेळत असतांना अचानक कुलरजवळ गेली. कुलरमधील विजेचा धक्का लागल्याने या मुलीचा जागेवरच मृत्यू झाला. युक्तीचे आई वडील व कुटुंबीय घरातच हाेते. मात्र त्यांच्या लक्षात येइपर्यंत युक्तीचा मृत्यू झाल्याचेच समाेर आले. मात्र युक्तीला विजेचा धक्का लागल्याची माहिती मिळताच कुटुुंबीय व परिसरातील नागरिकांनी तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले होते मात्र, डाॅक्टरांनी युक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. युक्तीच्या मृत्यूमुळे गाेगे कुटुंबीयांवर दुखाचा डाेंगर काेसळला.

कुलरमधील विजेचा धक्का लागल्यानेच चिमुकलीचा मृत्यू झाल्याचे प्राथमीक तपासणीत समाेर आले आहे. कुलरला असलेल्या बटनांचा एक वायर कटून त्यामधील करंट कूलरच्या जाळीला लागला. संपुर्ण कूलरमधून विजेचा प्रवाह सुरु असतांनाच युक्तीचा हात कूलरला लागला व विजेचा धक्का तीला लागल्याने यामध्येच तीचा मृत्यू झाल्याची माहीती आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!