Sunday, June 16, 2024
Homeगुन्हेगारीनागपूर शहरातील ओयो हॉटेल यश-२४ येथे पोलिसांचा छापा ! ऑनलाईन पद्धतीने केला...

नागपूर शहरातील ओयो हॉटेल यश-२४ येथे पोलिसांचा छापा ! ऑनलाईन पद्धतीने केला जातोयं देहव्यापार

Nagpur crime अकोला दिव्य न्युज ब्युरो : शहरात ऑनलाईन पद्धतीने सुरु असलेल्या ओयो हॉटेल यश-२४ येथील देहव्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा घातला. छाप्यात दिल्ली, पश्चिम बंगाल आणि दिल्लीतील ५ तरुणींना देहव्यापार करताना ताब्यात घेण्यात आले तर देहव्यापाराचे सूत्रधार असलेल्या पाच जणांना अटक करण्यात आली.बालाजीनगर-बंशीनगर मेट्रो स्टेशनजवळ हिंगना मार्गावर ओयो होटल यश-२४ नावाचे हॉटेल आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तेथे दिल्ली, मुंबई, काश्मीरसह अन्य राज्यातील तरुणींना देहव्यापार करण्यासाठी बोलावण्यात येत होते. गुन्हे शाखेच्या कविता इसारकर यांना माहिती मिळताच त्यांना बुधवारी छापा घातला. 5 तरुणींना देहव्यापार करताना ताब्यात घेतले. तर दलाल यश दीपकराव बलोदे, शुभम बळवंत मालखेडे रा. चांदुरबाजार, अमरावती, संकेत विष्णू तितरमारे, मनोज अरूण खंडाळे आणि सागर मधूकर बिजवे रा. अचलपूर, अमरावती यांना अटक केली.

नागपुरात आंबटशौकीन ग्राहकांसाठी काश्मीर, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि पंजाबमधील तरुणींना करारतत्वावर बोलावण्यात येत होते. दलाल राहुल आणि मनोज अग्रवाल ऊर्फ गगन ठाकूर हे अन्य राज्यातील तरुणींशी संपर्क साधून त्यांची नागपुरात राहण्याची व्यवस्था करीत होते. रजत, रोशन, नीलेश आणि प्रिंस हे राजकीय क्षेत्रातील आणि व्यापारी क्षेत्रातील श्रीमंत ग्राहक शोधून हॉटेलमध्ये पाठवत होते. त्यामुळे ऑनलाईन देहव्यापार करणारी मोठी टोळी नागपुरात सक्रीय असल्याची माहिती समोर आली.

छाप्यातील तरुणी उच्चशिक्षित
देहव्यापार करताना सापडलेल्या तरुणी उच्चशिक्षित असून त्यांचे इंग्रजीवर प्रभूत्व आहे. आपला स्वत:चा खर्च भागविण्यासाठी त्या देहव्यापाराच्या दलदलीत उतरल्या आहेत. झटपट पैसा कमावून मित्रांसोबत दारु पार्टी, पब, विमान प्रवास, आवडते ड्रेस, महागड्या हॉटेलमध्ये राहणे किंवा शॉपींग करण्यासाठी पैसा तरुणी कमावत होत्या, अशी माहिती समोर आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!