Thursday, September 19, 2024
Homeताज्या घडामोडीमुंबईत हाहाकार ! भलंमोठं लोखंडी होर्डिंग कोसळून 100 वर लोक अडकले !...

मुंबईत हाहाकार ! भलंमोठं लोखंडी होर्डिंग कोसळून 100 वर लोक अडकले ! 30 जणांवर उपचार सुरू : जनजीवन विस्कळित

अकोला दिव्य न्युज ब्युरो : मुंबई शहरासह उपनगरांमध्ये वादळी वारा आणि जोरदार पावसाने धुमाकूळ घातला असून, सोसाट्याचा वाऱ्यामुळे शहरात दोन मोठ्या दुर्घटना घडल्या. घाटकोपरमधील एका पेट्रोल पंपावर भलंमोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं असून या होर्डिंग्जखाली जवळपास 100 च्यावर लोक आणि पेट्रोल पंपावरील 80 वाहने अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य युद्धपातळीवर सुरू केले. आतापर्यंत 30 ते 35 लोकांना यामधून बाहेर काढण्यात आले असून, जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचारा सुरू आहे.आता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. दरम्यान, वडाळ्यात पार्किंग टॉवर  वाहनांवर कोसळल्यानेही काही जण जखमी झाल्याचे समजते. अवघ्या एका तासात अवकाळी पावसाने थैमान घालीत जनजीवन विस्कळित केले

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि परिसरात वादळी वारा सुरू झाल्यानंतर घाटकोपरमधील एका पेट्रोल पंपाच्या शेजारीच असणारं लोखंडी होर्डिंग पंपावर कोसळलं. या होर्डिंगखाली पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या चार ते पाच गाड्या आणि पावसापासून बचावासाठी आश्रय घेण्यास आलेले काही नागरिक अडकल्याचं सांगितलं जात आहे. या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दुपारच्या सुमारास जोरदार वादळी वारे आणि तुफान पावसाला सुरुवात झाली आहे. मुलुंड, भांडूप, कुर्लासह अंधेरी, गोरेगाव, कांदिवलीतही वादळी वारा व पावसाने थैमान घातले आहे. हवामान खात्यानं वादाळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. वादळी वाऱ्यांमुळे दृश्यमानता कमी झाली आहे. याचा परिणाम मुंबई विमानतळावर झाला आहे. मुंबई विमानतळाचा रनवे बंद करण्यात आला आहे.यासोबतच ओव्हरहेड वायर तुटल्याने अनेक उपनगरीय रेल्वे गाड्यांना थांबवून ठेवले आहे.

मुंबई उपनगरांत वादळी वाऱ्यांमुळे काही ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाल्याचीही माहिती समोर आली आहे. मुलुंड, भांडूपच्या काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला आहे. दुसरीकडे ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर भागात वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस कोसळत आहे. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!