Saturday, November 9, 2024
Homeगुन्हेगारीइन्कमटॅक्सचा अकोल्यात 3 ठिकाणी छापा ! सोने आणि कोट्यावधी रुपयांची रोकड...

इन्कमटॅक्सचा अकोल्यात 3 ठिकाणी छापा ! सोने आणि कोट्यावधी रुपयांची रोकड जप्त ! गडिया ठक्कर व रोहडा यांच्याकडे कारवाई

अकोला दिव्य न्युज ब्युरो : आयकर विभाग नागपूर विभागाकडून अकोल्यातील अशोकराज आंगडिया आणि डाळ मिल उद्योजक व थोक सुपारी विक्रेता आणि एक व्यावसायिक असे 3 जणांच्या येथे आज बुधवार 15 मे रोजी सकाळी टाकण्यात आलेल्या छाप्यात अंदाजे कोट्यावधी रुपयांची रोकड आणि काही किलो सोने जप्त करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. वृत्त लिहिस्तोवर कारवाई सुरू होती.

अकोला येथील अशोकराज आंगडिया कुरिअरचे कार्यालय आणि संचालक ठक्कर यांच्या नवरंग सोसायटी येथील निवासस्थानी तसेच निकुंज गडिया यांचं निवासस्थान व कार्यालयात आणि अकोला औद्योगिक वसाहतीतील डाळ मिल उद्योजक आणि थोक सुपारी विक्रेता रोहडा यांच्या डाळ मिल, सिंधी कॅम्प येथील निवासस्थान आणि नवीन किराणा बाजारातील दुकान येथे एकाच वेळी वर्धा येथील आयकर विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छापा टाकून कारवाई सुरू केली. झाडाझडती घेताना उद्योजक रोहडा यांच्या घरात एका बॅगेत कोट्यावधी रुपयांची रोकड व काही किलो सोने बघून सर्वाचे डोळे विस्फारून गेले. अधिकारीही विस्मयचकित झाले.तसेच डाळ मिल व दुकानातून रोकड व महत्त्वाचे कागदपत्रे मिळाले आहे, असे सूत्रांनी सांगितले.

अशोकराज आंगडिया कार्यालयात रोकड देवाणघेवाणबाबतची कागदपत्रे व रोख रक्कम तसेच निवासस्थानी देखील बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. सकाळपासून तर वृत्त लिहीस्तोवर सुरू असलेल्या या कारवाईत तीन जणांचा घरातून कोट्यावधी रुपयांची रोकड असा ऐवज जप्त करण्यात आले आहे. अशोकराज आंगडिया कुरिअर कडून रोख कोट्यावधी रुपये हस्तगत केले आहे.निकुज गडियाकडील कारवाईतील नेमक्या मुद्देमालाची माहिती नाही.‌आयकर विभागाकडून तीन ठिकाणी केलेल्या कारवाईची सध्या अधिकृतपणे काहीही माहिती जाहीर करण्यात आली नाही.‌ तीनही ठिकाणी जप्त कोट्यावधी रुपयांची रोकड व मुद्देमाल अकोला आयकर विभागात सुरक्षित केले आहे.

जप्त करण्यात आलेली रोकड मोजण्यासाठी मशिन उपलब्ध करून घेण्यात आल्या आहेत. विभागाच्या पथकात जवळपास 50 वर अधिकारी व कर्मचारी असून काल रात्रीला अकोल्यातील चार ठिकाणी या पथकाने मुक्काम केला. काल रात्रीला अकोला जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन बंदोबस्तासाठी पोलिसांना तैनात करण्याची कल्पना दिली. आयकर पथक अकोला मुक्कामी असून उद्या कोण रडारवर आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!