Tuesday, May 21, 2024
Home सामाजिक जय छावा ! संभाजी राजे जयंती निमित्ताने आखाडे, भजनी मंडळे, देखावे आणि...

जय छावा ! संभाजी राजे जयंती निमित्ताने आखाडे, भजनी मंडळे, देखावे आणि ढ़ोल ताशांसह निघाली मिरवणूक

अकोला दिव्य न्युज ब्युरो : संभाजी राजे जयंती निमित्ताने शहरातील शिवाजी पार्क येथून हजारो युवकांच्या सहभागासह भजनी मंडळे, विविध देखावे आणि ढ़ोल ताशांसह मिरवणुक काढण्यात आली. मिरवणूकीचा प्रारंभी आ. रणधीर सावरकर, अनुप धोत्रे, छावा जिल्हा प्रमुख शंकरराव वाकोडे, डॉ. दीपक मोरे, डॉ. श्रीराम लाहोळे, तुकाराम दुधे, डॉ. रणजीत कोरडे, जयंतराव मसने, छावाचे प्रसिद्धी प्रमुख प्रदीप खाडे, सुरेश ख़ुमकर गुरुजी, मनीराम ताले, अरविंद कपले, चंद्रशेखर पांडे गुरुजी, अशोक पटोकार यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.

मागील ३ वर्षा पासून कोरोनामुळे मिरवणुकीत खंड पड‌ला होता. त्यामुळे या वर्षी हजारो युवक मोठ्या उत्साहाने या मिरवणूकीत सह‌भागी झाले होते. महिलांची उपस्थिती सुध्दा लक्षणीय होती. मिरवणूकीत हनुमान व्यायाम मंडळ आळंदा ,महाकाली महिला भजनी मंडळ, जय भोले डमरु भजन मंडळ दानापूर, ढोलाचे भजन सिरसोली, ज्ञानराज माऊली भजनी मंडळ पिंपळखुटा, जय हनुमान भजनी मंडळ पिंप्री जैनपुर, जय भोले भजनी मंडळ वरुड बिहाडे, जय सोपीनाथ टाळकरी मंडळ तांदळी , जय हनुमान भजनी मंडळ बेलुरा बु., सांप्रदायीक भजनी मंडळ कंचनपुर , जय गजानन महाराज भजनी मंडळ डाबकी रोड अकोला, महिला भजनी मंडळ शिवसेना वसाहत अकोला, शिवप्रतिष्ठान भजनी मंडळ चिखलगांव, यांने सह विविध आखाडे, लेझीम पथके, ढ़ोलताशे वादक मिरवणू‌कीत सहभागी झाले होते.

या वर्षी मोठ्या संख्येने भजनी मंड‌ळे सहभागी झाल्याने मिरावणुकित धार्मिक वातावरणासह वेगळीच रंगत भरली होती. मिरावणुकित अनेक ठिकाणी विविध आखाड्यांनी चीत्त ववेधक प्रात्यक्षिक सादर केली. हजारो नगरिकांनी दुतर्फा उभे राहून मिरवणूकीचे स्वागत केले. मिरावणुकितिल अनेक थरारक दृष्यांनी व आखड्याच्या खेळांनी डोळ्याची पारणे फेडली. मिरावणुकीच्या मार्गावरसमाजसेवी संघटनांनी पाणी व शरबताचे वाटप केले.
सायंकाळी शिवाजी पार्क येथून निघालेली ही मिरवणूक अकोट स्टॅन्ड, टिळक रोड, महाराणा प्रत्ताप चौक, गांधी रोड, सिटी कोतवाली चौक, गांधी चौक, खुले नाट्य गृह चौक आदी मार्गाने फिरुन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्य गृहाजवळ तीचा समारोप करन्यात आला.

समृध्दी भाजीपाले व अनन्या भाजीपाले यांनी घोड्यावर बसुन साकारलेली शिवकालीन महिलांची भुमिका मिरावणुकीची रंगत वाढवून गेली. जय कोल्हे या बालकाने संभाजी राजांची भुमिका साकारली. मिरवणूकीत संतोष भिसे, मनोहर पंजवानी, विरेन्द काळे, अनिरुद्ध भाजीपाले, बालु बगाडे, संतोष ढोरे, प्रकाश गवळी, बाळू पाटील तायडे, अनील बोर्डे, रवि पवार, सोपान महाराज खराटे, सुरेश पाटील गाढे, रवि साखरे, निवृत्ती वानखडे, शाम कोल्हे,अमोल हिंगणे, बाळासाहेब लाहोळे, निखील क्षीरसागर, माधव मानकर, प्रविण बाणेकर परिक्षीत बोचे, अँड. सुशील खवले, मनोहर मांगटे पाटील, सोनू गिरी, शाम कुलट, आशु वानखडे पहेलवान, ज्ञानेश्वर मानकर, दीपक बिहाडे, रजनीस ठाकरे, चेतन लोखंडे ,प्रभु मेसरे, संजय घोगरे, गोपाळराव गालट, बबलू वसु, यश सावल,बालू भाऊ रंधे, गजानन गोलाईत, योगेंद्र गोतमारे, ब्रम्ह‌कुमार पांडे, अविनाश पारसकर, शशि दांदळे, सागर तायडे, नितीन देशमुख, नितिन चव्हान, केशव बगाडे, धनराज गावंडे याचे सह तालुका व शहर कार्यकारिणी चे सर्व पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते. सुमारे ४ तास चाललेली भव्य मिरवणूक अतिशय शांततेच्या वातावरणात पार पडली

RELATED ARTICLES

ट्रोलिंगने महिलेचा बळी ? चिमुकल्याच्या बचावाचा Video व्हायरल झाल्यानंतर आत्महत्या केल्याचा संशय!

अकोला दिव्य न्युज ब्युरो : ऑनलाईन ट्रोलिंगमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागल्याच्या घटना गेल्या काही काळात समोर आल्या आहेत. काही बाबतीत हे...

विदर्भ विदर्भ नेत्रतज्ञ सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ. शिरीष थोरात तर सचिवपदी डॉ. श्रीराम लाहोळे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : विदर्भ नेत्रतज्ञ सोसायटीच्या अध्यक्षपदी अकोला येथील नेत्रतज्ञ डॉ. शिरीष थोरात तर अकोला येथील नेत्रतज्ञ डॉ.श्रीराम लाहोळे यांची...

प्रदीप नंद यांचा राष्ट्रीय प्रतिभा सन्मान पुरस्कार देऊन गौरव ! जगातील एकमेव गणपती मुर्ती संग्रहालयाची उत्तुंग भरारी

अकोला दिव्य न्युज ब्युरो : देशासह विदेशातील कलाप्रेमी आणि गणेश भक्तांमध्ये अल्पावधीत लोकप्रिय झालेले चिखलदरा येथील नंद गणपती संग्रहालयचे संस्थापक संचालक प्रदीप...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ट्रोलिंगने महिलेचा बळी ? चिमुकल्याच्या बचावाचा Video व्हायरल झाल्यानंतर आत्महत्या केल्याचा संशय!

अकोला दिव्य न्युज ब्युरो : ऑनलाईन ट्रोलिंगमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागल्याच्या घटना गेल्या काही काळात समोर आल्या आहेत. काही बाबतीत हे...

संपत्ती आणि सत्तेचा माज ! ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवालसह 4 जणांवर गुन्हा : पण.. प्रश्न कायमच

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : संपत्ती,सत्ता कमविण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. तो कसं कमवायचे हवा, हा अधिकार देखील आहे.पण याच सत्ता,...

विदर्भ विदर्भ नेत्रतज्ञ सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ. शिरीष थोरात तर सचिवपदी डॉ. श्रीराम लाहोळे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : विदर्भ नेत्रतज्ञ सोसायटीच्या अध्यक्षपदी अकोला येथील नेत्रतज्ञ डॉ. शिरीष थोरात तर अकोला येथील नेत्रतज्ञ डॉ.श्रीराम लाहोळे यांची...

उद्या 12 वीचा निकाल जाहिर होणार ! गेल्यावर्षी राज्याचा निकाल ९१.२५ टक्के होता

अकोला दिव्य न्युज ब्युरो : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट (सीआयएससीई) एक्झामिनेशनने (सीआयसीएसई) या शिक्षण...

Recent Comments

error: Content is protected !!