Saturday, September 21, 2024
Homeताज्या घडामोडीपंतप्रधान मोदी म्हणतात,आमच्या घरीही ईद साजरी व्हायची ! माझ्या घरी सर्व मुस्लिम...

पंतप्रधान मोदी म्हणतात,आमच्या घरीही ईद साजरी व्हायची ! माझ्या घरी सर्व मुस्लिम कुटुंबातून जेवण यायचे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : माझ्या घराभोवती सर्व मुस्लिम कुटुंबे होती. आमच्या घरीही ईद साजरी व्हायची. इतर सणही साजरे केले जायचे. ईदच्या दिवशी माझ्या घरी जेवण बनायचे नाही. माझ्या घरी सर्व मुस्लिम कुटुंबातून जेवण यायचे. मोहरम सुरू झाला की ताजियाखालून बाहेर पडायचं हा नियम असायचा. मी त्या जगात वाढलो. पण २००२ साली गोध्रा नंतर माझी प्रतिमा खराब झाली, असं नरेंद्र मोदी म्हणाले.न्यूज १८ ने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. वाराणसी लोकसभा मतदारसंघातील गंगा नदीच्या काठावर ही मुलाखत पार पडली.

गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदींनी केलेली मुस्लिमविरोधी वक्तव्ये पाहता त्यांना या निवडणुकीत मुस्लिम मते मिळणार नाहीत, असं वातावरण होतं. परंतु, त्यांनी यावर भाष्य करताना सांगितले की, मी मुस्लिम कुटुंबात राहिलो असून त्यांच्याबरोबर जेवलो सुद्धा आहे. माझे शासन मॉडेल धर्म किंवा जातीच्या आधारावर आधारलेलं नाही, असं मोदींनी स्पष्ट केलं. ते पुढे म्हणाले की, “मी लहानपणी मुस्लिम कुटुंबात राहिलो आहे. माझे अनेक मुस्लिम मित्र आहेत.असे पंतप्रधान मोदी यांनी म्हणाले. मोहरमच्या दिवशी आम्हाला ताजियाच्या खाली जायला शिकवले गेले, असंही ते म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की, “२००२ नंतर जेव्हा त्यांची प्रतिमा डागाळली तेव्हा त्यांनी जमिनीवरील वास्तव जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले.

अहमदाबादमध्ये मानेक चौक नावाची जागा आहे जिथे लोक संध्याकाळी जेवायला जातात. पण दिवसा सर्व व्यापारी मुस्लिम आणि सर्व खरेदीदार हिंदू आहेत. मी काही लोकांना त्या मार्केटमध्ये सर्वेक्षण करण्यासाठी पाठवले. त्यांच्यापैकी एकजण माझ्याविरोधात बोलला तेव्हा दुकानदाराने त्याला थांबवले आणि म्हणाले, ‘मोदींविरुद्ध एक शब्दही बोलू नका. मोदींमुळे माझी मुलं शाळेत जात आहेत. जवळपास ९० टक्के दुकानमालकांचे म्हणणे असेच होते, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत परंतु ते या सर्वांची जाहिरात करत नाहीत. ‘सबका साथ सबका विकास’ हा माझा मंत्र आहे. मी व्होट बँकेसाठी काम करत नाही. जर काही चुकीचे असेल तर मी ते चुकीचे आहे असे म्हणेन”, पंतप्रधान म्हणाले. मला विश्वास आहे की देशातील लोक मला मतदान करतील. ज्या दिवशी मी हिंदू-मुस्लिम करायला लागेन, तेव्हा मी सार्वजनिक जीवनात राहण्यास योग्य राहणार नाही. मी हिंदू-मुस्लिम फूट पाडणार नाही, ही माझी बांधिलकी आहे, असंही ते म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!