Sunday, June 16, 2024
Homeताज्या घडामोडीममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्याबाबत अतिशय वादग्रस्त असे विधान केले आहे. गंगोपाध्याय मिदनापूर जिल्ह्यातील एका जाहीर सभेत बोलत असताना म्हणाले, “भाजपाच्या संदेशखालीमधील उमेदवार रेखा पात्रा यांना दोन रुपयांना विकत घेतले आहे, असा आरोप तृणमूल काँग्रेस करत आहे. मग मला विचारायचे आहे की, ममता बॅनर्जी यांची किंमत काय आहे, १० लाख रुपये का?” गंगोपाध्याय यांच्या विधानानंतर आता तृणमूल काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या काही दिवस आधी गंगोपाध्याय यांनी न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला होता. ते पश्चिम बंगालच्या तामलुक मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

अभिजीत गंगोपाध्याय काय म्हणाले?
जाहीर सभेला संबोधित करत असताना अभिजीत गंगोपाध्याय म्हणाले की, रेखा पात्रा यांच्याबद्दल अवमानकारक विधान तुम्ही कसे केले? कारण ममता बॅनर्जी या एका प्रसिद्ध ब्रँडकडून आपला मेकअप करून घेतात. तर रेखा पात्रा या घरकाम करतात, म्हणून तुम्ही त्यांना दोन हजारांत घेतल्याचे म्हणता का? एक महिला दुसऱ्या महिलेशी इतक्या अपमानास्पद पद्धतीने कसे काय बोलू शकते? असा सवाल गंगोपाध्याय यांनी उपस्थित केला.

तृणमूल काँग्रेसकडून टीका
अभिजीत गंगोपाध्याय यांच्या टीकेवर आता तृणमूल काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. पश्चिम बंगालच्या अर्थमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी म्हटले की, एक सभ्य गृहस्थ अशी भाषा वापरू शकतो, याचे मला आश्चर्य वाटत आहे. गंगोपाध्याय यांनी आता सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तुम्ही नक्की माणूसच आहात ना? याबद्दल लोकांना आता शंका वाटत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!