Thursday, September 19, 2024
Homeगुन्हेगारीअकोल्याची मोठी बातमी ! अकोला खदान पोलिस ठाण्याचे ठाणेदार सायरेवर विनयभंगाचा गुन्हा...

अकोल्याची मोठी बातमी ! अकोला खदान पोलिस ठाण्याचे ठाणेदार सायरेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला खदान पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस निरीक्षकाने पोलिस खात्यात कार्यरत पोलिस हवालदाराच्या मुलीच्या फ्लॅटमध्ये शिरून पिस्तुलाच्या धाकावर तिच्याशी अश्लील चाळे केले. तिला न्यूड फोटो पाठविण्याची धमकी दिली. अशी तक्रार पिडीत मुलीने दिल्याने या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनंजय सायरे विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराने पुन्हा एकदा पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगून ठेवले गेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित २२ वर्षीय तरुणी अपर्णाचे (बदललेले नाव) वडील सुद्धा पोलीस खात्यात आहेत. तिच्या वडिलाची धनंजय सायरेशी मैत्री होती. त्यामुळे धनंजयचे नेहमी घरी येणे-जाणे होते.अपर्णालाही पोलीस अधिकारी व्हायचे आहे. धनंजयने तिच्याशी मैत्री केली. आर्थिक व इतर मदतीचे प्रलोभन दाखवून धनंजय सायरेने आपल्या जाळ्यात ओढले. त्याने तिला आयफोन भेट दिला तसेच तिला आर्थिक मदत केली. दरम्यान अर्पणा ही नागपूर येथील नंदनवन भागात वास्तव्यास होती. येथे राहून यूपीएससी परीक्षेची तयारी करीत होती. गेल्या काही दिवसांपासून धनंजय अपर्णाला व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील मॅसेज पाठवायला लागला. ‘तू मला न्यूड फोटो पाठव…’ असा संदेश त्याने पाठवला. त्यामुळे अपर्णाला धक्का बसला. तिने फोटो पाठविण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेला धनंजय सायरे शनिवारी सायंकाळी नागपुरात आला व थेट अर्पणाच्या फ्लॅटवर गेला. तिला शारीरिक संबंधाची मागणी करीत तिच्यावर बळजबरी करायला लागला. तिने नकार देताच तिच्यावर पिस्तूल रोखली आणि लैंगिक छळ केला. त्याने भेट दिलेला आयफोनही हिसकावून घेतला. नंतर तिला मारहाण केली. अपर्णाने थेट नंदनवन पोलीस ठाणे गाठले. पोलिसांत वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय सायरे याच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

नंदनवन पोलिसांनी धनंजय सायरे विरुद्ध भादवि कलम 354 अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास नंदनवन पोलीस करीत आहेत.पोलीस खात्याची बदनामी होऊ नये म्हणून नंदनवनचे ठाणेदार आणि अन्य अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करीत होते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!