Saturday, July 27, 2024
Homeअपघातमोठी दुर्घटना टळली ! मुर्तिजापूरचे होमगार्ड ठाकरेंच्या प्रसंगावधानाने सर्वांचा जीव वाचला

मोठी दुर्घटना टळली ! मुर्तिजापूरचे होमगार्ड ठाकरेंच्या प्रसंगावधानाने सर्वांचा जीव वाचला

अकोला दिव्य न्युज ब्युरो : लोकसभा निवडणुकीत मुंबई बोईसर येथील बंदोबस्तासाठी तैनात असलेले मुर्तिजापूर येथील होमगार्डचे पथक मुर्तिजापूरकडे येत असताना, ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे बस रस्ते दुभाजकाला जाऊन धडकली आणि ड्रायव्हर गाडीच्या बाहेर फेकल्या गेला.पण क्षणाचाही वेळ न घालवता होमगार्ड अक्षय ठाकरे यांनी स्टेअरींग सांभाळून बस थांबल्याने दुर्घटना व मोठी प्राणहानी टळली.

Oplus_131072

मुंबई लोकसभा निवडणुक बंदोबस्तासाठी बोईसर येथे तैनात मुर्तिजापूर येथील होमगार्डना घेऊन अर्नाळा डेपोची MH.14 BT. 3882 या क्रमांकाची बस बोईसर येथून अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूरसाठी येत होती. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील बायपास वरील उड्डाणपूलापासून अवघ्या 100 मिटर अंतरावर ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे बस रस्त्याच्या डिवायडरला धडकुन अपघात झाला. या धडकेत ड्रायव्हर गाडीच्या खाली फेकल्या गेला. बसमध्ये असलेल्या अक्षय ठाकरे यांना हे लक्षात येताच, जिवाची पर्वा न करता चालकाच्या जागी जाऊन बसचे स्टेरिंग सांभाळुन मोठा अपघात टाळला.

या अपघातात होमगार्ड गोपाल जाधव (1150) संतोष गणोजे (943) अश्फाक खान (1281) रामदास बावनकर (997) निलेश आटेकर (1146) प्रमोद गांवडे (914)सतीष गांवडे (944)कैलाश वानखडे (922) धिरज श्रीवास (1328) आणि मुर्तिजापूर तालुका समादेशक अधिकारी नाईक यांना चांगलीच दुखापत झाली. कोणाच्या पायाला तर छातीला मार लागला दुखापत झाली आहे. इतरही होमगार्ड जखमी झाले, त्यांना पोलिस वाहनाने मलकापुर येथील शासकीय रुग्णालयात भरती करुन प्राथमिक उपचार करण्यात आले. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. ड्रायव्हर दारु प्यायला होता,असे होमगार्डचे म्हणणे आहे. जखमी होमगार्डना सरकारने तातडीने आर्थिक मदत करुन अक्षय ठाकरे यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करावे, अशी मागणी मुर्तिजापूरवासीयांनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!