Friday, December 13, 2024
Homeगुन्हेगारीAkola crime : अकोल्यातील कुख्यात गुंड शाकीर खानवर ‘एमपीडीए’ची कारवाई ! ...

Akola crime : अकोल्यातील कुख्यात गुंड शाकीर खानवर ‘एमपीडीए’ची कारवाई ! पाेलिस अधीक्षकांची वक्रदृष्टी

अकोला दिव्य न्युज ब्युरो : जुने शहरातील कुख्यात गुंड शाकीर खान उर्फ पप्या अहेमद खान याच्याविराेधात ‘एमपीडीए’नुसार कारवाई करीत त्याला एक वर्षांसाठी कारागृहात स्थानबद्ध करण्याची कारवाई मंगळवारी पाेलिस अधीक्षकांच्या निर्देशानुसार जुने शहर पाेलिसांनी केली. शहरात मारामाऱ्या करणे, शस्त्रांचा धाक दाखवून खंडणी उकळणे व दहशत निर्माण करणाऱ्या गावगुडांवर जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांची वक्रदृष्टी पडल्याचे पुन्हा एकदा समाेर आले आहे.

जुने शहरातील हमजा प्लाॅट येथील कुख्यात गुंड शाकीर खान उर्फ पप्या अहेमद खान (२६)याच्याविराेधात यापुर्वी खूनाचा प्रयत्न करणे, घातक हत्यारांनी दूखापत करणे, भूखंड, घरांवर अतिक्रमण करणे, चोरी करणे, बेकायदेशिररित्या शस्त्र बाळगणे,जीवे मारण्याची धमकी देणे असे विविध स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर प्रतिबंधक कार्यवाही करून ताे जुमानत नव्हता. त्यामुळे कुख्यात शाकीर खानला स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव पाेलिस अधीक्षकांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्याकडे सादर केला. या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी ६ मे राेजी मंजूरी दिली हाेती. ही कारवाइ ‘एसपी’सिंह यांच्या निर्देशानुसार ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, ‘पीएसआय’आशिष शिंदे, पोहेकॉ. ज्ञानेश्वर सैरिसे, पोकॉ. उदय शुक्ला तसेच जुने शहर पाेलिस स्टेशनचे पाेलिस निरीक्षक नितीन लेव्हरकर, ‘एपीआय’रविंद्र लांडे यांनी केली. 

शाकीर खान झाला हाेता फरार
पाेलिस यंत्रणेने आपल्या विराेधात ‘एमपीडीए’ची कारवाइ केल्याची कुणकुण लागताच कुख्यात गुंड शाकीर खान फरार झाला हाेता. परंतु पाेलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत २१ मे राेजी जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले. आराेपीला अटक केल्यापासून त्याच्या स्थानबध्दतेचा कालावधी सुरू झाला आहे. पाच महिन्यांत ‘एमपीडीए’अंतर्गत तब्बल १४ जणांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे,हे येथे उल्लेखनिय.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!