Saturday, October 5, 2024
Homeअपघातबॉयलर स्फोट दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू, 48 गंभीर जखमी मृतांची...

बॉयलर स्फोट दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू, 48 गंभीर जखमी मृतांची संख्या वाढण्याची भीती

डोंबिवली एमआयडीसी केमिकल कंपनीत आज दुपारी २ च्या सुमारास बॉयलरचा भला मोठा स्फोट आणि त्यानंतर छोटे स्फोट झाले. या घटनेत सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर ४८ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी विविध खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी आगीचे लोळ आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर येत होते. नागरिकांनाही या घटनेचा मोठ्या प्रमाणावर त्रास झाला. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.

काय घडली घटना?

डोंबिवलीत्या एमआयडीसी फेज दोन मध्ये अंबर केमिकल कंपनीत दुपारी २ ते २.३० च्या सुमारास मोठा स्फोट झाला. या कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटाचे हादरे तीन ते चार किलोमीटर परिसरात जाणवले. यामुळे इमारतींच्या काचाही फुटल्या तसंच काही कार्संचंही नुकसान झालं आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. धुराचे लोट आणि आगीचे लोळ मोठ्या प्रमाणावर असल्याने बचाव कार्यात अडथळे येत होते. आता या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तीन मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. एक्स पोस्ट करत देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं? भीषण स्फोटानंतर

एमआयडीसीतून बाहेर पडलेल्या एका कामगाराने सांगितलं की, स्फोट झाला ती आमच्या बाजूची कंपनी होती. इतका मोठा स्फोट होता की, आम्ही सगळे बाहेर पडलो. सगळे आगीचे लोळ येत होते. आमच्या हाताला भाजले आहे, असं कामगाराने एका चॅनलला सांगितलं. काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मोठे स्फोट झाले, दोन ते तीन किलोमीटरपर्यंत हादरे जाणवले. अनेकांच्या घरांच्या काचेच्या खिडक्या फुटल्या आहेत. अग्निशमन दलाकडून अतिरिक्त कुमक मागवून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!