Sunday, June 16, 2024
Homeगुन्हेगारीनागपुरात नशेत दोघांना उडविणाऱ्या रितू मालूला जामीन नाकारला ! मर्सिडिजने घेतले होते...

नागपुरात नशेत दोघांना उडविणाऱ्या रितू मालूला जामीन नाकारला ! मर्सिडिजने घेतले होते दोन बळी

अकोला दिव्य न्युज ब्युरो : पुण्यातील पार्शे कारसारखा भीषण अपघात करणारी नागपूरची ३९ वर्षीय धनाढ्य महिला रितिका उर्फ रितू दिनेश मालू हिचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला. न्यायाधीश आर. एस. पाटील (भोसले) यांनी हा निर्णय दिला.

ही हृदयद्रावक घटना २५ फेब्रुवारी २०२४ रोजी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास मुख्य रेल्वेस्थानकाजवळच्या रामझुल्यावर घडली होती. रितिका मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात मर्सिडिज कार चालवित होती. तिने रामझुल्यावर मोहम्मद हुसैन गुलाम मुस्तफा (३४, रा. नालसाहब चौक) व मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया (३४, रा. जाफरनगर) यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे हे दोन्ही तरुण दूरवर फेकल्या जाऊन गंभीर जखमी झाले. त्यानंतर घटनास्थळावरील नागरिकांनी दोन्ही तरुणांना जवळच्या मेयो रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरनी मोहम्मद हुसैनला तपासून मृत घोषित केले, तर मोहम्मद आतिफचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  दोनही तरुण बँक फायनान्सचे काम करीत होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!