Thursday, October 10, 2024
Homeगुन्हेगारीबोरगावमंजू येथे राडा ! बैल चोरीचा संशय अन् दोन गटात हाणामारी व...

बोरगावमंजू येथे राडा ! बैल चोरीचा संशय अन् दोन गटात हाणामारी व दगडफेक : परिस्थिती नियंत्रणात

अकोला दिव्य न्युज ब्युरो : बैल चोरीच्या संशयावरून दोन वेगवेगळ्या धर्मियांच्या गटांमध्ये हाणामारी व दगडफेक झाल्याची घटना जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारीवर दोन्ही गटांवर गुन्हे दाखल करून आठ आरोपींना अटक केली आहे. इतर आरोपींची धरपकड सुरू आहे. बोरगावमंजू गावामध्ये तणावपूर्ण शांतता असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.

बोरगाव मंजू गावातील धनगरपूरा वस्तीमध्ये सोमवारी रात्री दोन जण बैल घेऊन जात असतांना त्यांना त्याठिकाणी उपस्थितीत इतर दोन जणांनी बैल चोरीचे आहेत काय? अशी विचारणा केली. त्यावरून किरकोळ स्वरूपाचा वाद झाला. या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. यावेळी दोन्ही बाजुचे प्रत्येकी १५ जणांनी एकमेकांवर लोखंडी पाईप व लाकडी काठ्यांनी हाणामारी सुरू केली. यावेळी दगडफेकही करण्यात आली. त्यामध्ये दोन्ही बाजुचे लोक जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

जखमींना तत्काळ उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी श्रीकांत उर्फ अनिकेत राजेंद्र गवळी रा. बोरगाव मंजू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मोहम्मद अयफास मो. अफसर, शेख जुबेर शेख मुन्शी, शेख सददाम उर्फ सज्जू शेख गणी, शेख इमरान मुस्तफा कुरेशी व इतर १० ते १२ जणांवर, तर शेख जुबेर शेख मुन्शी रा.बोरगाव मंजू यांच्या फिर्यादीवरून आरोपी अनिकेत राजेंद्र गवळी, योगेश भाऊराव मोरे, केशव साहेबराव मोरे, साहेबराव नारायण मोरे व इतर १० ते १२ जणांवर परस्पर विरोधी भादंवि कलम ३२४, १४३, १४७, १४८, १४९ सहकलम १३५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

Oplus_131072
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!