Saturday, July 27, 2024
Homeअर्थविषयकभाजपला सत्ता नाही ? शेअरबाजार धाराशायी : FII ने 4 दिवसात २.८९...

भाजपला सत्ता नाही ? शेअरबाजार धाराशायी : FII ने 4 दिवसात २.८९ अब्ज डॉलर काढले

अकोला दिव्य न्युज ब्युरो : 18 व्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाला 18 एप्रिल रोजी सुरूवात झाल्यानंतर, मतदानाचा एक एक टप्पा जसं जसा पार पडू लागला, तसाच भारतीय शेअर बाजारात घसरणीचा ट्रेंड सातत्याने पाहायला मिळत आहे. आज बुधवार २९ मे रोजी बाजार उघडल्यावर काही मिनिटांतच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स ५५० हून अधिक अंकांनी कोसळला तर निफ्टीही १५० हून अधिक अंकांनी घसरला. परिणामी अवघ्या काही मिनिटांतच गुंतवणूकदारांचे एक लाख कोटींहून अधिक नुकसान झाले. बाजार उघडताच सेन्सेक्ससोबतच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकही धाराशायी झाला.

रेकॉर्डवर रेकॉर्ड करणाऱ्या भारतीय शेअर बाजारात अचानक झालेल्या घसरणीचे रहस्य उघड झाले आहे. सातासमुद्रापार असलेल्या गुंतवणूकदारांकडून विक्री केली जात असल्याने अवघ्या चार दिवसांत गुंतवणूकदारांचे सुमारे चार लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. झाले असून अवघ्या एका दिवसात सुमारे तीन लाख कोटी रुपये स्वाहा झाले. सेन्सेक्सही तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये सुमारे १,५०० अंकांनी घसरला असून बुधवार, २९ मे रोजी सेन्सेक्समध्ये सुमारे ६०० अंकांनी खाली आला. तर सततच्या विक्रीचे कारण काय, असा प्रश्नही गुंतवणूकदारांना सतावत आहे.

परदेशी गुंतवणूकदारांकडून शेअर बाजार धडाम
मे महिन्यापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंतीची बाजारपेठ असलेल्या भारतीय बाजाराचा आता भ्रमनिरास होत आहे. परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजे FII आशियाई बाजारांतून सर्वाधिक पैसा भारतातून काढून घेत असून याचा दबाव देशांतर्गत गुंतवणूकदारांवरही दिसून आला आणि विक्रीचा सपाटा लावला. परिणामी एकट्या मे महिन्यात FII ने भारतीय बाजारातून २.८९ अब्ज डॉलर (सुमारे २४ हजार कोटी रुपये) काढून घेतले जे जानेवारी २०२४ नंतर सर्वाधिक आहे.

विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा
परकीय गुंतवणूकदारांनी भारतातून सर्वाधिक पैसा काढला त्यानंतर, इंडोनेशियामधून ७०० दशलक्ष डॉलर, व्हिएतनाममधून ४१५ दशलक्ष डॉलर, थायलंडमधून २१० दशलक्ष डॉलर आणि फिलिपिन्सच्या बाजारातून ५८ दशलक्ष डॉलर्स काढले. याउलट जपानमध्ये सर्वाधिक ६३ हजार कोटी रुपये, तैवानमध्ये ५२ हजार कोटी रुपये आणि दक्षिण कोरियामध्ये १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!