Friday, September 20, 2024
Homeगुन्हेगारीअकोल्यातील सराफ्यात महिलेवर चाकू हल्ला ! बाजारपेठेत खळबळ

अकोल्यातील सराफ्यात महिलेवर चाकू हल्ला ! बाजारपेठेत खळबळ

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला शहर व जिल्ह्यात गुन्हेगारांनी डोके वर काढले असून, पहिल्यांदा अकोला सराफा बाजारात भरदिवसा एका महिलेवर चाकूने हल्ला करण्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण बाजारपेठेत खळबळ उडाली असून, या घटनेत महिला जखमी झाली आहे.

अकोला शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराफ गल्लीत आज शनिवारी दोन महिला जात असताना दोन युवकांनी त्यांची छेड काढली. तेव्हा एका महिलेने विरोध केला असता, एका युवकाने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहून दुसरी महिला तिच्या मदतीला धावली. या झटापटीत युवकाने हातातील चाकूने या महिलेवर वार केला. चाकूच्या वारने जखमी झालेली महीला जमीनीवर कोसळली. तर तिच्या सोबतीला असलेल्या महिलेने त्या युवकांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.मात्र तो पळून गेला.

सराफा बाजारातील या घटनेमुळे मुख्य बाजारपेठेत दहशतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान या हल्ल्याची संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. अकोला शहरातील गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नाही. अकोला पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बच्चन सिंह यांनी गुटखा माफियांच्या मुसक्या आवळल्याने वर्तमान पत्रात रकानेच्या रकाने भरुन लिहिले गेले. आज शहरात सरेआम वरली मटक्यासह अवैध धंदे सुरू आहेत. शहरातील रहदारी व्यवस्था कोलमडून पडली आहे. दररोज लहानसहान अपघात होतात. अॅटोवाल्यावर वाहतूक पोलीसांचा वचक राहिला नाही. पण शिस्त लावण्यासाठी प्रयत्न केले जाताना दिसत नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!