Saturday, October 5, 2024
Homeअपघातपोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू

पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू

पुण्यातील कल्याणीनगर येथील पॉर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच, शिरूर तालुक्यातूनही अशीच एक घटना समोर आली आहे. पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने दुचाकी वरील दोघांना उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत अरुण विठ्ठल मेमाणे ( वय ३०) यांचा मृत्यू झाला असून महेंद्र रावसाहेब बांडे हे गंभीर जखमी झाले आहेत. अल्पवयीन मुलगी पीकअप गाडी चालवत होती. या गाडीने मृत तरुणाला ३० ते ४० फूट फरपटत नेल्याचेही समजते.

शिरूर तालुक्यातील वडगाव बांडे-आरणागाव  रोडवर पोलिस पाटील संतोष लेंडे यांनी आपल्या अल्पवयीन मुलीला पीक अप गाडी चालवण्यासाठी दिली होती. पाटील स्वतः दुसऱ्या सीटवर बसले. याच रस्त्यावरून दुचाकीस्वार महेंद्र बांडे आणि अरुण मेमाणे हे न्हावरेगावाकडे जात होते. यावेळी मात्र पीक अप गाडीची दुचाकीला जोरात धडक बसून दुचाकीवरील तरुण खाली पडले. यातील अरुण मेमाणे हा पीक अपच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्याला गाडीने जवळपास ३० फुटांपर्यंत फरपटत नेले.  त्यात त्याचा मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. 

अपघात घडल्यानंतर पिक अप मालक घटनास्थळी न थांबता तेथून निघून गेला. त्यांच्या विरोधात मृत्यूस कारणीभूत असल्याची तक्रार देण्यात आली आहे. याबाबत मृत युवकाचा भाऊ सतिश विठ्ठल मेमाणे याने शिक्रापूर पोलिसांत तक्रार दिली आहे. स्थानिक नागरिकांनी आणि नातेवाईकांनी या दोघांना रुग्णालयात दाखल केले मात्र अरुण मेमाणे याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!