Thursday, September 19, 2024
Homeराजकारणअकोल्यातील चुरशीच्या लढतीत अनुप धोत्रे विजयी !

अकोल्यातील चुरशीच्या लढतीत अनुप धोत्रे विजयी !

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या चुरशीच्या लढतीत भाजप महायुतीचे उमेदवार अनुप संजय धोत्रे यांनी मतमोजणीच्या १५ व्या फेरीत त्यांच्या निकटचे प्रतिस्पर्धी व कॉंग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांचा 40 हजार 12 मतांनी पराभव करुन, अकोला लोकसभा मतदारसंघ भाजपकडे कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. भाजपचा गड असलेल्या विदर्भात भाजपला लागोपाठ पराभव पत्करावा लागत शेवटी भाजपला फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांनी विजयी होऊन पुर्व विदर्भात भाजपची इभ्रत राखली तर अनुप धोत्रे यांनी पश्चिमेत पक्षाची उमेद कायम ठेवली. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अँड प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून डॉ. अभय पाटील यांनी मताधिक्य मिळवून १४ व्या फेरीपर्यंत ९ हजार ९४ मताधिक्य कायम ठेवून होते.पण १५ व्या फेरीत डॉ.पाटील यांच्या मताधिक्यावर मात करून १ हजार ९३ मतांची आघाडी घेतली आणि प्रत्येक फेरीत हे मताधिक्य वाढत गेले. अंतिम फेरीत भाजपाचे अनुप धोत्रे यांनी 4 लाख 53 हजार 866 मते घेत विजय खेचून आणला. अंतिम निकालात भाजपाचे अनुप धोत्रे यांना 4,53,866 तर काँग्रेस महाविकास आघाडीचे डॉ. अभय पाटील यांना 4,13,854 मते मिळाली असून वंचित आघाडी प्रकाश आंबेडकरांनी 2,74,823 मते पटकाविली.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!