Saturday, October 5, 2024
Homeताज्या घडामोडीमहाराष्ट्रात राजकीय भुकंप ? अजित गटाचे १०-१५ आमदार शरद पवारांच्या संपर्कात ?...

महाराष्ट्रात राजकीय भुकंप ? अजित गटाचे १०-१५ आमदार शरद पवारांच्या संपर्कात ? बैठकीतही खलबते

अकोला दिव्य न्युज ब्युरो : राज्यातील लोकसभेच्या निकालानंतर धास्तावलेले आमदार बाहेर पडण्याच्या भीतीने अजित पवार गटाने बैठका सुरु केल्या आहेत. अशातच अजित पवार गटाचे १० ते १५ आमदार पुन्हा शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. हे आमदार केव्हाही अजित पवारांची साथ सोडू शकतात, असे या सुत्रांचे म्हणणे आहे. यामुळे राज्यात लोकसभेनंतर फोडाफोडीच्या राजकारणाचा पुढचा अंक लिहिला जाण्याची शक्यता आहे.

एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता असून सरकारही काहीसे अस्वस्थ झाल्याचे संकेत मिळत आहेत. शिंदे गट मंत्रिमंडळ विस्तार करण्याबाबत मागणी करण्याच्या तयारीत आहे. तर आज झालेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबतच्या बैठकीतही १५ दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सत्तेत आल्यानंतर नेते आणि कार्यकर्त्यांना खुश ठेवायला हवे होते. परंतु, राष्ट्रवादीला सत्तेत घेतल्यानंतर उरलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार नाराजीच्या भीतीने टाळण्यात आला. शिंदे गटातही तशीच नाराजी होती. महामंडळांवरही नियुक्त्या करण्यात आल्या नाही. आता विधानसभा निवडणुकीला चार महिनेच उरले असून या नाराजीचा फटका लोकसभेला बसला आहे, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. अशातच आता निकालामुळे धास्तावलेल्या आमदारांना कसे थांबवायचे यावर अजित पवारांच्या बैठकीच विचारमंथन सुरु आहे. 

त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदावरून राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केल्याने महायुतीत मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणी केल्याने लोकसभेतील पराभवानंतर सरकारमध्ये अस्वस्थता पसरली आहे. फडणवीस दिल्लीला गेले असले तरी त्यांचे काय होणार याबाबतही साशंकता आहे. अशातच आपले अस्तित्व टिकविण्यासाठी अजित पवार गटाचे आमदार सुप्रिया सुळेंच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार गटाने जोरदार प्रदर्शन केले आहे. यामुळे आपल्या आमदारकीला फटका बसण्याची धास्ती या आमदारांनी घेतली आहे. अजित पवारांचे आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे वृत्त एबीपी आणि आजतकने दिले आहे. 

Maharashtra Politics: 10-15 MLAs of Ajit Pawar group in contact with Sharad Pawar?

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!