Thursday, September 19, 2024
Homeअर्थविषयकअकोला इंडस्ट्रीज असोसिएशनची नवीन कार्यकारिणी ! ३७ वी वार्षिक आमसभा संपन्न

अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनची नवीन कार्यकारिणी ! ३७ वी वार्षिक आमसभा संपन्न

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनची ३७ वी वार्षिक आमसभा उद्योजक भवन, असोसिएशनचे कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सर्वप्रथम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भीमराव धोत्रे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष उन्मेश मालू, उपाध्यक्ष मनोज खंडेलवाल, सहउपाध्यक्ष नरेश बियाणी, सहसचिव निखिल अग्रवाल, कोषाध्यक्ष रितेश गुप्ता असोसिएशनचे कार्यकारणी सदस्य यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आमसभेची सुरुवात करण्यात आली.

असोसिएशनचे मानद सचिव नितीन बियाणी यांनी आपले मनोगत व्यक्त करीत वर्ष २०२३-२४ चा वार्षिक अहवाल सभेसमोर वाचून दाखविला. त्यानंतर अध्यक्ष उन्मेश मालू यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व सहकारी, वरिष्ठ सदस्य, मार्गदर्शक मंडळ, निवडणूक अधिकारी, सदस्य, राजकीय नेते, इतर संस्था, अधिकारी, पत्रकार, संस्थेचे ऑडिटरसह सर्वांच्या सहकार्याने जबाबदारी पार पाडू शकलो असे सांगत या बद्दल आभार व्यक्त केले. येणा-या काळात आपले सहकार्य व स्नेह वृद्धिंगत होईल अशी आशा अध्यक्षांनी व्यक्त केली.

त्यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने आमसभेला सुरुवात होऊन सचिव नितीन बियाणी यांनी मागील आमसभेचे सभावृत्तांत वाचून दाखविला. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वर्षाचा ऑडिट रिपोर्ट व वर्ष २०२४-२५ चे अंदाज पत्रकाची प्रत सभेत वितरित करुन अंदाजपत्रक २०२४-२५ वर चर्चा करण्यात आली. सर्वानुमते वर्ष २०२३-२४ चा ताळेबंद व २०२४-२५ चा अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची कोषाध्यक्ष रितेश गुप्ता यांनी उत्तरे दिली.

यावेळी असोसिएशनची वार्षिक पुस्तिकेचे प्रकाशन संपादक मंडळ मनोज खंडेलवाल, राहुल मित्तल, कमलेश अग्रवाल, रुपेश राठी यांच्या हस्ते करण्यात आले. वार्षिक पुस्तिका लवकरच सर्व सदस्यांना वितरित करण्यात येईल, असे सांगण्यात आले. सी.ए अमर मुंदडा यांनी एक रुपये मानधन घेऊन ऑडिटरचा कार्यभार कुशलतेने सांभाळल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले. .

वर्ष २०२४ ते २६ या कालावधीकरिता नवीन पदाधिकारी व कार्यकारणी सदस्यांची निवड करण्याकरिता निवडणूक अधिकारी म्हणून कृष्णा खाडे, श्रीकांत पडगिलवार, ज्ञानप्रकाश खंडेलवाल यांनी विशेष सहकार्य केले. त्यानंतर असोसिएशनचे निवडणूक अधिकारी यांनी नविन बिनविरोध निवडून आलेल्या कार्यकारी मंडळातील पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांची नावे घोषित केली. यामध्ये अध्यक्षपदी मनोज खंडेलवाल, उपाध्यक्ष नरेश बियाणी, सहउपाध्यक्ष कमलेश अग्रवाल, मानद सचिव नितीन बियाणी, सहसचिव निखिल अग्रवाल, कोषाध्यक्ष रितेश गुप्ता, कार्यकारणी सदस्यपदी अजय खंडेलवाल, अमित बंसल, चेतन अग्रवाल, गिरीश जैन, किरीट मंत्री, किशोर अग्रवाल, कृष्णा खटोड, लक्ष्मीकांत डागा, लोकेश भाला, महेंद्र पुरोहित, पवन माहेश्वरी, राहुल मित्तल, रवी पोहनकर, रुपेश राठी, संजय शर्मा, संजय श्रावगी, संतोष वाधवानी, शैलेश खटोड, विष्णू खंडेलवाल, शुभम खंडेलवाल यांची निवड करण्यात आली.

असोसिएशनच्या कार्यात सर्व शासकीय व निमशासकीय विभागाचे अधिकारी. कर्मचारी सदैव तत्पर असतात आणि सर्वांचे सहकार्य नेहमीच मिळाले आहे.असे सांगत आमसभेला उपस्थित सर्व सदस्य व हितचिंतकाचे सचिव बियाणी यांनी आभार मानले. आमसभा व व्यापार सत्राचे अध्यक्षांच्या समापण केले. आमसभेला कार्यकारणी सदस्य तसेच रमेश राजोरीया, महेंद्र गढीया, धनेश भाला,कान्तीभाई गोरसिया, निरंजन अग्रवाल, अशोक बन्सल, वसंत बाछुका, प्रमोद खंडेलवाल,जयंत पडगिलवार उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!