Saturday, July 20, 2024
Homeगुन्हेगारीगुजरातच्या गोध्रा येथे 'NEET' चे पेपर सोडवून देणारी टोळी ! प्राचार्यासह 13...

गुजरातच्या गोध्रा येथे ‘NEET’ चे पेपर सोडवून देणारी टोळी ! प्राचार्यासह 13 जणांना अटक

अकोला दिव्य ऑनलाईन : देशभरात गाजत असलेल्या ‘NEET’ परिक्षा पेपर घोटाळ्याचे रॅकेट गुजरातेत असल्याचे उघड झाले आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत गुजरातेतील पंचमहल जिल्ह्यातील गोध्रा शहरातील जलाराम उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यांसह पाचजणांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली असून, जलाराम उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यांसह पाचजणांनी २७ विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० लाख रुपये घेतल्याचे असल्याचे उघड झाले आहे. शाळेतच NEET केंद्र होते, जिथे ही २७ मुले पेपर देण्यासाठी आली होती. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली. नीट-यूजी परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण होण्यात विद्यार्थ्यांना गैरमार्गाने मदत केल्याचा आरोप आहे. परीक्षेच्या ५ मे या तारखेपूर्वीच परीक्षेची रंगीत तालीम घेण्यात आली होती. यात ३५ विद्यार्थी सहभागी झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका रिकाम्याच ठेवण्यास सांगण्यात आले होते. या उत्तरपत्रिका शिक्षकांकडून भरण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या आर्थिक मोबदल्याच्या हिशेबाने यात उत्तरे भरली गेली. या प्रकरणी २.३० कोटी रुपयांचे धनादेशही पोलिसांनी जप्त केले आहेत.

नीट परीक्षेवरून देशभरात वाद सुरू असतानाच झालेल्या या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. नीट परीक्षेत पेपरफुटी झाल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत. बिहारमध्ये एका आरोपीने मला हुबेह्व पेपर परीक्षेपूर्वी मिळाला होता, असा कबुलीजबाब पोलिसांसमोर आधीच दिलेला आहे. आतापर्यंतच्या पोलिस तपासात 13 उमेदवारांचे रोल कोड सॉल्व्हर टोळीकडे सापडले आहेत. पेपरफुटीच्या वेळी यातील चौघांना पोलिसांनी अटक केली होती. उर्वरित नऊ उमेदवारांच्या माहितीसाठी ईओयूने परीक्षा आयोजित करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (एनटीए) पत्र लिहिल्याचे सूत्रांनी सांगितले. ईओयू डीआयजी मानवजीत सिंग ढिल्लन यांच्या मते, एनटीएने त्यांच्या उत्तरात मागितलेल्या उमेदवारांची प्रवेशपत्रे पाठवली होती. पेपर लीक प्रकरणाचा तपास करणाऱ्या ईओयूशी संबंध असल्याबाबत चौकशी केली जाणार आहे, त्यांना प्रवेशपत्राद्वारेच उमेदवारांचे मोबाईल क्रमांक आणि पत्ते मिळाले होते. या पत्त्यावर नोटीस पाठवून उमेदवारांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

आता तपास अधिकारी उमेदवार आणि त्यांच्या पालकांची सलवार टोळीशी असलेल्या संबंधाबाबत चौकशी करणार आहेत. तसेच नऊ उमेदवारांना परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका सोडविणाऱ्या टोळीने लक्षात ठेवण्यास सांगितले होते का, याचीही विचारणा केली जाणार आहे.NEET पेपर लीक प्रकरणी 13 जणांना अटक करण्यात आली होती, तर बिहार पोलिसांच्या ‘आर्थिक गुन्हे युनिट’ने गेल्या महिन्यात सांगितले होते की, NEET-UG च्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरे परीक्षा होण्यापूर्वीच प्रकाशित करण्यात आली होती. सुमारे ३५ उमेदवारांना ५ मे. पेपरफुटीप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १३ आरोपींना अटक केली आहे. यातील चार आरोपी हे परीक्षार्थी असून उर्वरित त्यांचे आई-वडील आणि सॉल्व्हर टोळीचे सदस्य आहेत. ईओयूने या सर्वांची एक-एक करून रिमांडवर चौकशी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!