Thursday, October 10, 2024
Homeगुन्हेगारीमोठी बातमी ! EVM अनलॉक केली ? शिंदेसेनेचे वायकरांच्या नातेवाइकांच्या विरोधात गुन्हा...

मोठी बातमी ! EVM अनलॉक केली ? शिंदेसेनेचे वायकरांच्या नातेवाइकांच्या विरोधात गुन्हा दाखल

अकोला दिव्य ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रॉनिक मतदान मशिन संदर्भाने दाखल सर्वच याचिका फेटाळून लावल्याने EVM वरील संशयचे धुके सारून जात असताना, मोबाईल फोनने ईव्हीएम चक्क अनलॉक केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटरचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीला घेऊन अजून काही तक्रारी दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिंदेसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर हे केवळ 48 मतांनी विजयी आले असले तरी मतमोजणीबाबत उद्धवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी आक्षेप घेतला आहे. दरम्यान यासंदर्भात वनराई पोलिसांनी वायकर यांचा नातेवाईक मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता तपासात पंडीलकर ईव्हीएमशी जोडलेला मोबाइल फोन वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांनी त्यानुसार इतर उमेदवारांचे जबाब नोंदवले असून,लवकरच याप्रकरणी अटक वॉरंट जारी करण्यात येणार आहे.

वनराई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पंडीलकरकडे सापडलेला फोन हा दिनेश गुरव यानेच त्याला दिला होता. हा मोबाइल फोन ४ जून रोजी नेस्को सेंटरमध्ये वापरण्यात आलेले ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी आवश्यक असलेला ओटीपी तयार करण्यासाठी वापरला गेला. वनराई पोलिसांनी आरोपी पंडीलकर आणि गुरव यांना सीआरपीसी ४१ (ए) अंतर्गत नोटीसदेखील पाठवली आहे.

वनराई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामप्यारे राजभर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडीलकरचा मोबाइल त्यांनी ४ जून रोजी सीज केला. तसेच त्यातील डेटा शोधण्यासाठी तो मोबाइल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे (एफएसएल) पाठवला असून, त्या मोबाइल फोनवरील बोटांचे ठसेही घेतले आहेत. एफएसएल याच्या अहवालानंतर पंडीलकर हा नेमका कोणाच्या संपर्कात होता हे स्पष्ट होईल, असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले.

निवडणूक आयोगाकडून काही एंट्री पॉईंट, स्ट्राँग रूम अशा महत्त्वाच्या ठिकाणच्या कोनाकोपऱ्याचे सीसीटीव्ही फुटेज वनराई पोलिसांनी मागितले आहे. जे लवकरच मिळणे अपेक्षित असून, त्यानुसार पुढील तपासाला गती मिळेल. पोलिसांनी इतर उमेदवारांचे बयाणही नोंदवले असून, पंडीलकर आणि गुरव यांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल, अन्यथा आम्ही अटक वॉरंट जारी करू, असेही तपास अधिकाऱ्यांनी नमूद केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!