Thursday, October 10, 2024
Homeगुन्हेगारीअकोला मनपाचे तत्कालीन उपायुक्त पंकज जावळेवर अँन्टीकरप्शनची कारवाई ?

अकोला मनपाचे तत्कालीन उपायुक्त पंकज जावळेवर अँन्टीकरप्शनची कारवाई ?

अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त आणि अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ पंकज जावळे यांचे दालन आज गुरुवार २७ जुन रोजी ताब्यात घेऊन सील केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना येथील पथकाने त्यांचा स्वीय सहाय्यक शेखर देशपांडे यांच्या शहरापासून जवळच असलेल्या बुर्हानगर येथील घराचीही सायंकाळी झडती घेतली.दरम्यान आयुक्त जावळे फरार असल्याचे संकेत मिळत आहेत. पथकाच्या या कारवाईमुळे महापालिकेसह शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

एका बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गेल्या दोन दिवसांपासून गोपनियरित्या महापालिकेत चौकशी सुरू होती. या कारवाईबाबत पोलिसांकडून कमालीची गोपनियता पाळण्यात येत होती. आज गुरुवारी दुपारी अहमद नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे दोन कर्मचारी महापालिकेच्या छत्रपती संभाजीनगर रोडवरील प्रशासकीय इमारतीत दाखल झाले. त्यांनी आयुक्त जावळे यांच्या दालनासह स्वीय सहाय्यक बसत असलेली खोली ताब्यात घेतली. त्यानंतर काहीवेळाने तक्रारदारासह एक पथक महापालिकेत आले. त्यांनी उपायुक्तांना आयुक्तांच्या दालनात बोलावून घेत चौकशी सुरू केली. ही चौकशी बराचवेळ सुरू हाेती. चौकशीनंतर पथक तेथून निघून गेले. त्यानंतर या पथकाने काही कर्मचाऱ्यांच्या घराची झडती घेतली असल्याचे समजते.
महापालिका आयुक्त जावळे यांच्यावर कारवाई झाल्याने सावेडी ग्रामस्थांच्या वतीने महापालिकेसमोर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!