Thursday, December 12, 2024
Homeगुन्हेगारी'हम पंचगव्हाण के शेर' म्हणतं धुमाकूळ घालणाऱ्या आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

‘हम पंचगव्हाण के शेर’ म्हणतं धुमाकूळ घालणाऱ्या आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

अकोला दिव्य ऑनलाईन : लग्नात जेवणाच्या दरम्यान एका महिलेला क्षुल्लक कारणावरून रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यासोबतच मुलाने जखमी आईला दवाखान्यात नेले असता, त्यालाही रस्त्यात गाठून बेदम मारहाण करून जखमी केल्याने विविध कलमान्वये गुन्हा दखल करण्यात आलेल्या फरार आरोपींचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज आज दि.२८ जुन २०२४ रोजी अकोट येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश वी.एम.पाटील यांनी फेटाळून लावला. अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल अपराध क्रमांक २५५/२०२४ अन्वये भादंवि कलम ३२६,५०४,५०६,३४ मधील आरोपी शेख मुक्तार शेख रउफ ( २५ ) व शेख निमार शेख रउफ (३७) दोघेही राहणार काझीपुरा, पंचगव्हाण ता.तेल्हारा

अकोट येथील गौसीया नगर येथे एका नातेवाईकांच्या लग्नामध्ये आलेल्या पंचगव्हाण येथील शेख मुक्तार शेख रउफ (२५) व शेख निमार शेख रउफ (३७) या दोघांनी अगदी क्षुल्लक कारणावरून “हम पंचगव्हाण के शेर है” असे म्हणत धुमाकूळ घालून लग्नातील पाहुण्यांवर लोखंडी झारा व काठीने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी फिर्यादीवरून अकोट पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्यात आली. अकोट शहर पोलीसांनी अपराध क्रमांक २५५/२०२४ अन्वये भादंवि कलम ३२६, ५०४, ५०६,३४ अंतर्गत आरोपी शेख मुक्तार शेख रउफ (२५) व शेख निमार शेख रउफ (३७) दोघेही राहणार काझीपुरा, पंचगव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर आरोपी फरार झाले. दरम्यान आरोपींनी अकोट न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.

अकोट न्यायालयात दाखल अटकपूर्व जामीना अर्जावर आज सुनावणी सुरू होऊन सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी जामीन अर्जाला विरोध करतांना न्यायालयात लेखी उत्तर व युक्तीवाद सादर केला की, लग्नामध्ये जेवण सुरू असताना आरोपींनी संगनमत करून महिलांच्या पंगतीत आले. फिर्यादी महिलांनी त्यांना तेथून जाण्यास सांगितल्यावर “हम पंचगव्हाण के शेर है, हम यही पे खाना खाएगे”. “और मैं आर्मी मे नोकरी करता हूँ”. तेवढयात फिर्यादी महिलेचा पुतण्या अलीमोद्दीन याने देखील आरोपींना म्हटले की, माणसांच्या सोबत जावून जेवण करा, त्यावेळेस आरोपी शेख निसारने फिर्यादी महिलेच्या कपाळावर व डोळ्याच्या मधोमध काठीने मारहाण केली. महिलेच्या जखमेतुन रक्त निघत असल्याने फिर्यादीचा पुतण्या फिर्यादी महिलेस डॉक्टरकडे घेवून गेला. दवाखान्यातून परत येत असताना आरोपी त्यांच्या जवळ आले. त्यावेळी आरोपी शेख निसारने त्याच्या हातातील लोखंडी झारा अलीमोद्दीनच्या डोक्यात तीन वेळा मारला. त्यामुळे तो खाली पडला तेव्हा लोखंडी झारा त्याच्या उजव्या हातावर मारला. दरम्यान आरोपी शेख मुक्तारने जखमी अलीमोद्दीनच्या पायावर, हातावर, कंबरेवर व बरगळीवर काठीने मारहाण करून जखमी केले.

जखमी अलीमोद्दीनला नातेवाईकांनी ग्रामीण रूग्णालय अकोट येथे नेले. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात इलाजासाठी रवाना केले. परंतु तेथे इलाज शक्य नसल्याने त्याला नागपूर येथे उपचारासाठी जाण्यास सांगितले होते. परंतु नातेवाईकांनी अकोला येथील देवकी हॉस्पीटल येथे भरती करून उपचार सुरू केला. अशा लेखी तक्रार व वैद्यकीय प्रमाणपत्रा वरून ठाणेदार अमोल माळवे यांनी तपासात घेतला.आरोपींना त्यांच्याविरुद्ध अकोट शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याचे माहीत होताच त्यांनी अटक टाळण्यासाठी अकोट येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.

आज अकोटच्या न्यायालयात सुनावणी प्रकरणांत अकोट शहर पोलिसांनी दाखल केलेल्या आपल्या लेखी जबाबात सांगितले की, आरोपी जरी पंचगव्हाण येथील राहणारे असले तरी त्यांचे जवळचे नातेवाईक अकोट येथेच राहतात. या आरोपींकडून नवरी कडील लोकांवर दबाव आणून नवरदेव व नवरी यांच्या संबंधामध्ये फुट पाडण्याची शक्यता आहे. तसेच आरोपी शेख निसार सैन्य दलात नोकरी करतो. या गुन्ह्याबाबत त्याच्या वरीष्ठांना माहिती कळविणे बाकी असून, त्याचा युनिट बाबत माहिती काढणे सुरू आहे. फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर आरोपी दबाव आणून पुरावे फोडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करणे आणि अजून पुरावे जमा करणे बाकी आहे.आरोपींना अटकपूर्व जामीन दिल्यास पोलीसांना सहकार्य करणार नाहीत.या प्रकरणाचा तपास अजून पूर्ण झालेला नाही. त्यामुळे आरोपींचा अटकपूर्व जमानत अर्ज नामंजूर करण्यात यावा असा युक्तीवाद सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी केला. दोन्ही पक्षांकडून केलेल्या युक्तीवादानंतर अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.व्ही.पाटील यांनी आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!