Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीइतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी महिला ! कोण आहेत सुजाता सौनिक

इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी महिला ! कोण आहेत सुजाता सौनिक

Sujata Saunik IAS To Be Chief Secretary Of New Maharashtraअकोला दिव्य ऑनलाईन : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सौनिक या राज्याच्या पहिला महिला मुख्य सचिव आहेत. डॉ. नितीन करीर यांचा कार्यकाळ आज संपला. सेवा ज्येष्ठतेनुसार सौनिक यांची वर्षी लागली आहे. सुजाता यांचे पती मनोज सौनिक यांनी देखील राज्याचे मुख्य सचिव म्हणून धुरा सांभाळलेली आहे. सुजाता सौनिक या अतिरिक्त मुख्य सचिव होत्या. जून २०२५ मध्ये त्या निवृत्त होणार आहेत. नितीन करीर यांच्याकडून त्यांनी थोड्याच वेळापूर्वी पदभार स्वीकारला आहेत. सुजाता सौनिक या वरिष्ठ आयएएस अधिकारी आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार सुजाता सौनिक या वरिष्ठ होत्या. यानंतर राजेश कुमार (1988) व  इक्बालसिंह चहल (1989) हे दावेदार होते. 

सुजाता यांची नियुक्ती झाल्याने पती-पत्नी असे दोघेही मुख्य सचिव पदावर काम करण्याची पहिलीच वेळ आहे. सुजाता सौनिक या मुळच्या पंजाबच्या आहेत. मनोज सौनिक हे मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सल्लागार आहेत. मनोज सौनिक यांच्या निवृत्तीनंतर, सरकारने सुजाता सौनिक यांना मुख्य सचिव करण्याचा विचार टाळला होता. त्यांच्याजागी 1988 च्या बॅचमधील नितीन करीर यांना संधी देण्यात आली होती.

३१ डिसेंबर रोजी नियुक्त झालेले करीर हे या वर्षी मार्चमध्ये निवृत्त होणार होते. करीर यांचा कार्यकाळ तीन महिन्यांनी वाढविण्यात आला होता. अखेर करीर यांच्या नंतर सुजाता सौनिक यांना संधी देण्यात आली आहे. 

कोण आहेत सुजाता सौनिक?

सुजाता सौनिक यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण चंदीगड मध्ये झाले आहे. पंजाब विद्यापीठामधून इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी त्यांनी घेतलीय. त्यानंतर त्यांनी कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव गृहमंत्रालय, सरकारच्या सल्लागार सहसचिव अशा महत्त्वाच्या पदावर देखील कारभार सांभाळला आहे. त्या गेल्या तीन दशकांपासून प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!