Saturday, November 9, 2024
Homeराजकारणमतदार याद्या पुनर्लोकन व अद्ययावत करने आवश्यक - मदन भरगड

मतदार याद्या पुनर्लोकन व अद्ययावत करने आवश्यक – मदन भरगड

अकोला दिव्य ऑनलाईन : कोणत्याही निवडणुकीत मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे जनजागृतीसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदार यादीत नाव नसल्यामुळे हजारो मतदार विविध कारणांमुळे मतदानापासून वंचित राहिले. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी त्वरित उपाययोजना करण्यात यावी. या दृष्टीने प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मदन भरगड यांच्या नेतृत्वात निवडणूक अधिकाऱ्यांना आज निवेदन देण्यात आले.

मतदारांनी फॉर्म भरून दिल्यानंतरही मतदारांची नावे यादीत आली नाहीत. त्याचप्रमाणे ज्या मतदारांची दोन ठिकाणी नावे होते त्यांचे नाव कमी केल्याने मतदार यादीतून नाव गहाळ झाले. त्यामुळे अशा अनेक मतदारांना लोकसभा निवडणुकीत मतदान करता आले नाही. या मागची कारणे शोधून येणाऱ्या विधानसभा, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद यासारख्या सर्व होणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदार मतदानापासून वंचित राहू नये या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. प्रशासनतर्फे वर्षानुवर्षे बि.एल.ओ च्या माध्यमातून मतदार याद्या दुरुस्त करण्याचे काम करीत आलो आहे, त्यानंतरही हजारो मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे या पुढील निवडणुकीत मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनातर्फे प्रक्रिया सुलभ करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा महानगरपालिका या ठिकाणी केंद्र सुरू केल्यास नागरिकांना थेट या ठिकाणी संपर्क साधून राहण्याचा पत्ता बदल, नावात दुरुस्ती, मतदार ओळखपत्र, गहाळ झालेले, तसेच नवीन नाव परत समाविष्ट करणे यासारख्या त्रुटी दूर करण्यासाठी त्यांना फॉर्म भरता येईल. यासोबतच अकोला शहरातील काही प्रमुख चौकात प्रशासनातर्फे शिबिर आयोजित केल्यास नागरिकांना या सर्व अडचणी सोडविण्यासाठी सोयीस्कर होईल.

नागरिकांना सुविधा होण्याच्या दृष्टीने विविध राजकीय पक्षांतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरूच आहेत परंतु त्यानंतरही यश मिळताना दिसत नाही. प्रशासनातर्फे सुद्धा प्रयत्न सुरू आहेत मात्र त्यानंतरही त्रुटी राहत असल्याने, नागरिकांना नाहक मतदार केंद्रावर हेलपाटे घ्यावे लागतात. यासाठी मार्गदर्शन केंद्र सुरू झाल्यास नागरिकांना थेट संवाद साधून आपल्या अडचणी निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर मांडता येतील, व त्या अडचणींचे जागेवरच निराकरण करता येईल, त्यादृष्टीने प्रशासनाने कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली.या शिष्टमंडळात शहर अध्यक्ष प्रशांत वानखडे, राष्ट्रवादीचे राजकुमार मूलचंदानी, गणेश कटारे, राजेन्द चितलांगे, अभीषेक भरगड, अतुल अमानकर, रफीक लखानी, मनीष नारायणे, शशिकांत दवांडे, शिलास वरघट उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!