अकोला दिव्य ऑनलाईन : माहेश्वरी समाजातील जुन्या पिढीतील प्रतिष्ठित व्यक्तीमत्व आणि सधन कास्तकार गोकुलदास मेघराज गांधी यांचे वयोमानानुसार आज गुरुवार 4 जुलै रोजी देहावसान झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 94 वर्षाचे होते. शहरातील सनदी लेखापाल शंकरलाल गांधी यांचे ते वडिल आणि माहेश्वरी प्रगती मंडळाचे आनंद गांधी यांचे आजोबा होते. त्यांच्या मागे एक मुलगा, सुन, चार मुली, जावाई आणि नात नातवंडासह मोठं आप्तपरिवार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेगांव तालुक्यातील मानसगाव येथील मुळ निवासी गोकुलदास गांधी यांनी काही दिवसांपूर्वी वयाचे 94 वर्ष पूर्ण करून 95 व्या वर्षात प्रवेश केला होता.

वयोमानानुसार शारिरीक कुरबुरी वगळता त्यांची प्रकृती उत्तम होती. शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःचे सर्व कार्य ते स्वतः करीत होते. सदैव हसतमुख व सालस आणि लाघवी स्वभावामुळे मानसगावात सर्वांसोबत त्यांचे घरोप्याचे संबंध होते. तर काही वर्षांपासून अकोला येथे जेष्ठ पुत्र शंकरलाल गांधी यांच्याकडे वास्तव्यास असताना मानसगाव सोबतच अकोल्यातही त्यांनी स्नेही परिवार जोडला होता. अत्यंत साधी राहणी, प्रगत विचार आणि संयमित जीवन त्यांच्या जगण्याचे सुत्र होते.
त्यांची अंत्ययात्रा उद्या शुक्रवार 4 जुलै रोजी तोष्णीवाल ले-आऊटमधील त्यांच्या राहत्या निवासस्थानावरुन सकाळी 10 वाजता मोहता मिल मोक्षधामसाठी निघणार आहे. या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.