अकोला दिव्य ऑनलाईन : ब्रिटनचे नवे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचं सुरुवातीचे जीवन संघर्षांनी भरलेले होते. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या कीर स्टार्मर यांनी कठोर परिश्रम करून कायद्याचे शिक्षण पुर्ण केले. जीवनाच्या वाटेवर अविरतपणे मेहनत आणि जिद्दी वृत्तीने त्यांनी आज यशाचं शिखर गाठले. ब्रिटनच्या निवडणुकीत मजूर पक्षाचे कीर स्टार्मर यांनी ऋषी सुनक यांचा दारुण पराभव केला. मात्र प्रचार काळात त्यांनी आपल्या गरिबीचे ढोल बडविले नाही.तर केवळ आणि केवळ ऋषी सुनक यांच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे आपल्या देशाची आर्थिक पिछेहाट कशी झाली. हे मतदारांच्या लक्षात आणून दिले आणि मजूर पक्षाला १४ वर्षांनंतर ब्रिटनमध्ये परत सत्तास्थानी आणले. आता स्टार्मर हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान झाले आहेत.दरम्यान, लोकांना ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानांबद्दल जाणून घ्यायचे आहे. चला तर मग जाणून घेऊ त्यांच्या बद्दल…
स्टार्मर हे एक ब्रिटिश राजकारणी आणि वकील आहेत.कीर हे अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले आहेत. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना आणि भावंडांना मोठ्या कष्टाने वाढवले.कीर यांचे वडील एका कारखान्यात मदतनीस म्हणून काम करत होते आणि आई नर्स म्हणून काम करत होती. स्टार्मर यांच्या वडिलांनी त्यांचे नाव कीर हार्डी यांच्या नावावर ठेवले, जे लेबर पार्टीचे पहिले नेते होते ज्यांना स्टारर म्हटले जाते. कीर यांनी ‘रीगेट ग्रामर स्कूल’मध्ये शिक्षण घेतले.लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते. परिक्षेत चांगले गुण मिळवायचे. यामुळेच वयाच्या १६ व्या वर्षापर्यंत त्यांची फी स्थानिक कौन्सिल भरत होती. शाळेनंतर विद्यापीठात शिक्षणासाठी जाणारे कीर हे त्यांच्या कुटुंबातील पहिले सदस्य होते. त्यांनी १९८५ मध्ये लीड्स विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी १९८६ मध्ये सेंट एडमंड हॉल, ऑक्सफर्ड विद्यापीठातून नागरी कायद्याची पदवी प्राप्त केली.
स्टार्मर हे व्यवसायाने वकील आहेत. वकीली आणि खासदारकीचा पगार हेच त्यांच्या कमाईचे प्रमुख साधन आहे. दरम्यान, कीर स्टार्मर यांच्या संपत्तीची तुलना माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या संपत्तीशी केली तर त्यांच्याकडे ८४ पट कमी संपत्ती आहे.प्रोलिफिक लंडनच्या अहवालानुसार, कीर स्टार्मर यांची एकूण संपत्ती ७.७ मिलियन पाउंड (सुमारे ८२ कोटी रुपये) आहे. याशिवाय त्यांचे इतर १९९६ पासूनचे मालमत्तेचे गणित बसविले आणि त्यांच्याकडील जमीनीचा भाव लक्षात घेऊन गणना केली तर त्यांची एकूण संपत्ती १० ते १५ मिलियन पाउंडच्या दरम्यान असू शकते.
अहवालानुसार, कीर यांना २०२१ आणि २०२२ मध्ये खासदार म्हणून ७६,९६१ पाउंड इतका पगार मिळाला होता. विरोधीपक्षनेते असताना त्यांना ४९,१९३ पाउंड भत्ता म्हणून मिळाले. वकील म्हणून काम करताना त्यांनी २१ हजार पाउंड पेक्षा जास्त कमाई केली होती. मे २०२० मध्ये त्यांनी सात एकर जमीन देखील खरेदी केली, जीची किंमत १० मिलियन पाउंड आहे.त्याचवेळी आपण ऋषी सुनक यांच्या संपत्तीचा विचार केला तर ते ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात श्रीमंत पंतप्रधान ठरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती ६५१ मिलियन पाउंड (सुमारे ६,९५९ कोटी रुपये) आहे. ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांच्याकडे इन्फोसिस शेअर्सचा ०.९ टक्के हिस्सा आहे. यामुळे हे दाम्पत्य किंग चार्ल्स तिसरे (६०५ मिलियन पाउंड) यांच्यापेक्षा श्रीमंत ठरते.