Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीअकोल्यात जाणवला धक्का ! हिंगोली जिल्ह्यात ४.५ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

अकोल्यात जाणवला धक्का ! हिंगोली जिल्ह्यात ४.५ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला शहरातील काही भागात आज बुधवार १० जुलै रोजी सकाळी ७ ते ८ वाजताच्या दरम्यान अनेकांना भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. मात्र नेमका धक्का कशाचा ? याची खातरजमा करून घ्यावी म्हणून अनेकांनी दुसऱ्यांना विचारले, तेव्हा अनेकांनी आपल्यालाही काही क्षणांसाठी धक्का बसला असल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे जे बसून होते त्यांना हा धक्का जाणवला होता. अकोला शहरात जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता अत्यंत कमी असल्याने याची नोंद अकोला जिल्हा व्यवस्थापनाकडे झाली नाही. तर अकोल्यात जाणवलेल्या हा धक्का भूकंपाचा होता आणि या भूंकपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा (शिंदे) येथे असल्याचे हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने सांगितले. वसमत तालुक्यातील पांगरा (शिंदे) येथे भूकंपाचे केंद्र असल्याचे बोलले जात आहे.या तीव्र भूकंपाच्या धक्क्याने पेठ वडगाव येथील ऐतिहासिक किल्ल्याचा बुरुजला ढासळला. बुरुजाची मोठी पडझड झाली आहे. ऐतिहासिक किल्ल्याची भूकंपाच्या धक्क्याने झालेली हानीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हिंगोली जिल्ह्यात २१ मार्च रोजी सकाळी ६.८ मि ४.५ रिश्टर स्केलचा धक्का बसला,त्या नंतर त्याच तीव्रतेचा धक्का १० जुलै रोजी सकाळी ७.१५ मि ४.५ रिश्टर स्केलचा धक्का जाणवला आहे, मोठा भूकंप असल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले.गत पाच ते सहा वर्षा पासुन हिंगोली जिल्ह्यात भुकंपाचे धक्के बसत आहेत. २१ मार्च रोजी सकाळी ६.८ मि ला भुगर्भातुन जोराचा आवाज येत जमीन हादरली. आता पर्यंतचा हा सर्वात मोठा भुकंपाचा धक्का होता. त्याच तीव्रतेचा आज बुधवार १० जुलै रोजी सकाळी ७.१५ मि ४.२ रिश्टर स्केलचा धक्का बसला आहे.दरम्यान, हिंगोली जिल्ह्यासह  नांदेड व परभणी या जिल्ह्यातील अनेक गावांना पण आज बुधवारी झालेल्या भुकंपाचे हादरे जाणवले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!