Saturday, July 20, 2024
Homeगुन्हेगारीअकोल्यात विद्यार्थ्यांचा अपहरणाचा प्रयत्न ! शिक्षिकेची समयसूचकता; महिलेला अटक

अकोल्यात विद्यार्थ्यांचा अपहरणाचा प्रयत्न ! शिक्षिकेची समयसूचकता; महिलेला अटक

अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला शहरातील महानगर पालिका शाळेतील ३ विद्यार्थ्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.शाळेतील शिक्षिकेच्या समय सुचकता आणि तातडीने कारवाई केल्याने अपहरणकर्त्यां महिलेला अटक करण्यात आली.सदर महिला मानसिक रुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पण प्रकरण गंभीर असल्याने पोलिस सखोल चौकशी करीत आहे.

अकोला महापालिका समोर असलेल्या वाणिज्य संकुलात महानगरपालिका शाळा क्रमांक ४ मध्ये सदरची घटना आज घडली आहे. शाळा सुरू असताना, एक महिला विद्यार्थ्यांसोबत बोलत होती. एका शिक्षकेने हे बघितले. पण थोड्याच वेळात ३ विद्यार्थ्यांनासोबत घेऊन ही महिला जात असल्याचे बघून तीला अटकाव केला असता, ती काला चबुतराच्या दिशेने पळत गेले,पण आरडाओरडा ऐकून लोकांनी पकडून चोप दिला.

या घटनेची पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी येऊन पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान सदर महिला दहीहांडा गावाची असून मानसिक रुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले.‌

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!