Saturday, July 20, 2024
Homeताज्या बातम्यावाशिमला रूजू ! सॉरी मी याबाबत काहीच बोलू शकत नाही :...

वाशिमला रूजू ! सॉरी मी याबाबत काहीच बोलू शकत नाही : IAS पूजा खेडकर

अकोला दिव्य ऑनलाईन : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तुवणूक आणि अवाजवी मागण्यांमुळे चर्चे असलेल्या पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी आज वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात पदभार स्वीकारला.दरम्यान पूजा खेडकर यांना आज पत्रकारांनी ओबीसी जातप्रमाणपत्राबाबत विचारले असता त्यावर पूजा खेडकर म्हणाल्या, मी आज वाशिम रुजू झाले असून येथे काम करायला मी इच्छूक आहे. परंतु, झाल्या प्रकाराबाबत अधिकृतरित्या मी काहीही सांगू शकत नाही.याबाबत काही बंधने आहेत. सॉरी मी काहीच बोलू शकत नाही.असे त्यांनी उत्तर दिले.

पुणे येथून वाशिमला बदली करण्यात आल्यानंतर खेडकर यांच्या विविध सुरस कथा सातत्याने समोर येत आहेत. त्यांचा मॉक इंटरव्ह्यू व्हायरल झाला असून त्याखाली पूजा खेडकर यांना प्रचंड ट्रोल केलं जातंय. आता त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. बदली झालेल्या ठिकाणी त्या रुजू झाले असल्याचं त्यांनी आज सांगितलं.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!